सि​क्किमविरुद्ध गोव्याचा भेदक मारा

रणजी चषक : १०८ धावांत गुंडाळले, गोवा बिनबाद ९०, सुयशचे अर्धशतक

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
19th October, 12:29 am
सि​क्किमविरुद्ध गोव्याचा भेदक मारा

अर्धशतक झळकवणारा सुयश प्रभूदेसाई.

पणजी : रणजी चषक स्पर्धेत सिक्कम येथील एसआयसीए मैदान,रंगपो येथे गोवा ​विरुद्ध सिक्कम सामना शुक्रवारपासून खेळविण्यात येत आहे. या सामन्यात गोव्याच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत सिक्किमच्या संघाला अवघ्या १०८ धावांत गुंंडाळले. दिवसाअखेर गोव्या फलंदाजांनी बिनबाद ९० धावा केल्या होत्या. गोव्याचा संघ १८ धावांनी पिछाडीवर आहे. सुयश प्रभूदेसाईने आपले अर्धशतक पूर्ण केले असून तो ५० धावांवर नाबाद आहे.

सिक्किमच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदा​जी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय गोव्याच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. अवघ्या १४ धावसंख्येवर सिक्किमचा पहिला गडी पंकज रावतच्या रुपाने बाद झाला. त्याला वैयक्तिक ७ या धावसंख्येवर हेरंब परबने स्नेहल कवठणकर करवी झेलबाद केले. तर १८ धावा संख्येवर दुसरा सलामीवीर अरुण छेत्री अर्जुन तेंडुलकरचा शिकार ठरला. तोसुद्धा वैयक्तिक ७ धावांवर तंबूत परतला. गोव्याच्या गोलंंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत एका पाठोपाठ एक बळी घेतले. सिक्किमतर्फे पार्थ पलवतने सर्वाधिक ३९ धावा केल्या. त्याला अर्जुन तेंडुलकरने दुभाषीकरवी झेलबाद केले. प्लाझर तमंगने १९ धावांचे योगदान दिले. गोव्यातर्फे हेरंब परबने सर्वाधिक ३ बळी घेतले. अर्जुन तेंडुलकर, दर्शन मिशाळ व मोहित रेडकरने प्रत्येकी २ बळी घेतले. तर शुभम तारीने १ गडी बाद केला. सिक्किमचा संघ अवघ्या १०८ धावांवर बाद झाला.
प्रत्युत्तरात गोव्याच्या संंघाने चांगली सुरुवात केली. ​दिवसाअखेर गोव्याच्या ​बिनबाद ९० धावा झाल्या होत्या. रोहन कदम ३६ धावांवर तर सुयश प्रभूदेसाई ५० धावांवर खेळत होता.
संक्षिप्त धावफलक
सिक्किम : सर्वबाद १०८ : पार्थ पलवत ३९ (६५), प्लाझर तमंग १९ (१६), अर्जुन तेंडुलकर : १४-५-३१-२, हेरंब परब : १३-५-४२-३, दर्शन मिशाळ : ५-३-२-२, मोहित रेडकर : ३.५-०-९-२, गोवा बिनबाद ९० : रोहन कदम ३६ (६७), सुयश प्रभूदेसाई ५० (८३)