दिल्ली : खलिस्तानी संघटनेने घेतली 'रोहिणी सेक्टर-१४' ब्लास्टची जबाबदारी; एनएसजी तपासात गुंतली

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
21st October, 03:45 pm
दिल्ली :  खलिस्तानी संघटनेने घेतली 'रोहिणी सेक्टर-१४' ब्लास्टची जबाबदारी; एनएसजी तपासात गुंतली

नवी दिल्ली : दिल्लीतील रोहिणी सेक्टर १४  येथील सीआरपीएफ शाळेजवळ झालेल्या स्फोटात सातत्याने नवनवीन खुलासे होत आहेत. दिल्ली पोलिसांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या भिंतीजवळ पॉलिथिन बॅगमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती. ही बॅग १ फूट खोल खड्ड्यात लपवून ठेवली होती. हा खड्डा कुणाच्या दृष्टीस पडून नये म्हणून  त्यावर कचरा टाकण्यात आला होता. 

एनएसजीच्या टीमने रविवारी घटनास्थळी पोहोचून स्फोटाच्या आजूबाजूच्या परिसराची तपासणी केली.

याशिवाय दिल्ली पोलिसांनी जवळपास लावलेले सीसीटीव्ही फुटेजही तपासले. १ दिवसांपूर्वीच्या फुटेजमध्ये दिल्ली पोलिसांनी भिंतीजवळ पांढरा टी-शर्ट घातलेला एक व्यक्ती दिसली. या संशयित व्यक्तीचा शोध घेण्यात पोलीस व्यस्त आहेत. या  परिसरात रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या स्फोटात कोणीही जखमी झाले नसले तरी सणासुदीच्या काळात घडलेली ही घटना सुरक्षा यंत्रणांनी गांभीर्याने घेतली आहे. चार तपास यंत्रणा एकत्र काम करत आहेत.


आयईडी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधील सीआरपीएफ अधिकाऱ्यांनी जमिनीचे मूल्यांकन केले आहे. त्याचबरोबर एनएसजीचे बॉम्बशोधक पथकही आपला तपास अहवाल दिल्ली पोलिसांना सादर करण्याच्या तयारीत आहे. एनआयए आणि दिल्ली पोलिसांची फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीही आपापली चौकशी करत आहेत. दिल्ली पोलीस आज केंद्रीय गृह मंत्रालयाला स्टेटस रिपोर्ट सादर करू शकतात.

दिल्लीतील सीआरपीएफ शाळेजवळ झालेल्या स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. - दैनिक भास्कर

शाळेनजीक झालेल्या या बॉम्बस्फोटाची जबाबदारी खलिस्तानी संघटनेने घेतली आहे. हा संदेश 'जस्टिस लीग इंडिया'  या टेलिग्रामवर ग्रुपवर आला आहे. आज सोमवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी टेलिग्राम कंपनीकडून या मेसेजबाबत माहिती मागवली आहे. हा मेसेज पाकिस्तानमधून आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जवळपासच्या पोलीस स्थानकांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. बाजारपेठांमध्ये गस्तही वाढवण्यात आली आहे. त्याच बरोबर लोकांनी कोणतीही संशयास्पद वस्तू दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Biker', blast and a Telegram claim: Delhi Police probe mysterious Rohini  explosion | Delhi News - Times of India

दिल्ली पोलिसांची एटीएस या घटनेचा दहशतवादी दृष्टिकोनातून तपास करत आहे. रीसीवर लाइन आणि सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) लाही माहिती देण्यात आली आहे.


Delhi school blast: Multiple agencies probing matter, forensic teams test  mysterious powder - India Today


हेही वाचा