दिल्ली: 'सीआरपीएफ' स्कूलनजीक स्फोट. दिल्लीत अलर्ट जारी.

दिल्लीतील रोहिणी भागात सीआरपीएफ शाळेबाहेर झालेल्या भीषण स्फोटाची चौकशी सुरू आहे. या स्फोटानंतर सुरक्षा वाढवण्यात आली असून दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th October, 01:37 pm
दिल्ली: 'सीआरपीएफ' स्कूलनजीक स्फोट. दिल्लीत अलर्ट जारी.

नवी दिल्ली : दिल्लीतील सीआरपीएफ शाळेबाहेर रविवारी सकाळी स्फोट झाला. स्फोटानंतर तपास सुरू आहे.  दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला असून मोठ्या बाजारपेठांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिवाळीमुळे बाजारपेठांमध्ये गर्दी असते, त्यामुळे बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला गेला असावा अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

काल रात्रीपासून आज सकाळी नऊ वाजेपर्यंत सीआरपीएफ शाळेच्या आजूबाजूच्या अनेक किलोमीटर अंतरावर असलेल्या मोबाइल टॉवरवर किती फोन कॉल्स आले, याची तपासणी केली जात आहे. याशिवाय संपूर्ण परिसराचा डंप डेटा घेण्यात येणार असून, त्यावरून कालपासून पहाटे स्फोट होईपर्यंत किती फोन ॲक्टिव्ह होते हे कळेल. त्या सर्व ॲक्टिव्ह फोनची माहिती गोळा केली जाईल. यासोबतच स्फोटाच्या ठिकाणी इकडे-तिकडे पसरलेल्या पांढऱ्या पावडरचाही तपास सुरू आहे.

स्फोटानंतर तपास सुरू आहे. एफएसएल, स्पेशल सेल, संपूर्ण टीम घटनास्थळी हजर असून पुढील तपास सुरू आहे. काही दुकानांच्या काचा फुटल्या, कोणीही जखमी झाले नाही, दिल्ली पोलिसांचे पीआरओ संजय त्यागी यांनी सांगितले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा क्रूड बॉम्ब असू शकतो. वायरसदृश काही वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

एफआयआर नोंदवला

दिल्ली पोलिसांनी स्फोटक कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. हे प्रकरण लवकरच स्पेशल सेलकडे हस्तांतरित केले जाईल. सध्या स्पेशल सेल, एनआयए, सीआरपीएफ, एफएसएल आणि एनएसजी घटनास्थळी स्फोटाचा तपास करत आहेत. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून मॅपिंग केले जात आहे, सर्व दुकानांचे सीसीटीव्ही तपासले जात आहेत जेणेकरून बॉम्ब पेरणाऱ्या व्यक्तीची ओळख पटू शकेल.


हेही वाचा