संयुक्त अरब अमिरात : दुबई पोलिसांकडून पायी प्रवास करणाऱ्या ३७ जणांना दंड!

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
21st October, 06:03 pm
संयुक्त अरब अमिरात : दुबई पोलिसांकडून पायी प्रवास करणाऱ्या ३७ जणांना दंड!

दुबई : दुबईतील प्रत्येक नियमाप्रमाणेच रहदारीचे नियमही अतिशय कडक आहेत. याच संदर्भातील एक घटना समोर आली आहे. दुबई पोलिसांनी पायी प्रवास करणाऱ्या ३७ जणांना दंड केल्याचे समोर आले आहे. धोकादायक पद्धतीने रस्ते ओलांडणे, ट्राफिक सिग्नलचे नियम तोडणे आणि तत्सम नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दुबई पोलिसांनी ३६ जणांना प्रत्येकी ४०० दिरहमचा दंड ठोठावला आहे. 

Pedestrians Crossing Highways Will Face New Fines of Up to SAR 2,000

दुबईत रहदारीच्या नियमांची पायामल्ली करत बेदरकारपद्धतीने रस्ता ओलांडणे व तत्सम कृत्ये केल्यास कडक कायद्यांना समोरे जावे लागते यासाठी ४०० दिरहमचा दंड आहे. वारंवार नियम मोडणाऱ्या व्यक्तींना दंड केला जातो. याबाबत दुबई पोलीस वारंवार तेथील जनतेला सावध करण्यासाठी जागृती मोहीम राबवते, मात्र याचा जास्त फरक पडत नाही. दरम्यान   गेल्या वर्षी यात ८ जणांचा मृत्यू झाला होता, तर ३३९ जण जखमी झाले होते.

Dubai Police fines Pedestrians for not following JAY-Walking rule, know  what is this Law in Gulf city | દુબઈમાં રસ્તા પર ચાલનારા લોકોને પણ ભરવો પડે  છે હજારો રૂપિયાનો દંડ, શું છે

गल्फ न्यूजनुसार, २०२३ मध्ये नियम तोडत पायी प्रवास करणाऱ्या तब्बल ४४ हजार लोकांना दंड ठोठावण्यात आला होता. नुकतेच दुबईच्या ट्रॅफिक कोर्टाने एका अरब ड्रायव्हरला २००० दिरहमचा दंड ठोठावला आहे. तर पादचाऱ्यांना ४०० दिरहमचा दंड ठोठावण्यात आला आहे. ४०० दिरहम म्हणजेच भारतीय रुपयांत हा आकडा ९ हजार रुपये बनत आहे.

AED500 fine for not slowing down at pedestrian crossing - Dubi Cars - New  and Used Cars

हेही वाचा