केपे : भीषण अपघात : स्कोडा कारची दुचाकीला धडक; १ जण ठार तर अन्य एक जखमी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
21st October, 10:00 am
केपे : भीषण अपघात : स्कोडा कारची दुचाकीला धडक; १ जण ठार तर अन्य एक जखमी

केपे : राज्यात अपघातांचा आलेख सातत्याने वाढत आहे. आज पहाटे केपे येथे भीषण दुर्घटना घडली. आलीशान स्कोडा कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात अब्दुल कादर बादशाह याचा मृत्यू झाला तर सुफियान शेख हे गंभीर जखमी झाले. 

मिळालेल्या माहितीनुसार, सदर कारच्या चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. चालकाची ओळख पटवण्याच्या प्रयत्नात स्थानिकांनी कारमध्ये डोकावून पाहिले असता त्यांना गांजा सदृश पदार्थ आढळून आला. नशेच्या अमलाखाली गाडी चालवल्यानेच हा अपघात घडला असावा असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला. दरम्यान पोलिसांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी पोहचत पंचनामा केला तसेच अपघातास कारणीभूत गाडी देखील जप्त केली. 

दरम्यान कालच,  रविवार दि. २० रोजी पहाटे ४.३० वाजता नवीन मांडवी पुलावर एका दुचाकी चालकाने दुसऱ्या वाहनांना ओव्हरटेक करण्याच्या नादात आपली दिशा सोडून समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालक मसूद सावकार (३१, बेती - बार्देश) गंभीर जखमी झाले. त्यांना लगेच १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांना १०३ वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.

 बेदरकारपणे वाहन चालवणे, रस्त्यावरील खड्डे, वळणाचा अंदाज न आल्याचे गाडीचा अपघात, दारू किंवा अमलीपदार्थाच्या नशेत गाडी चालवणे तसेच गाडीत उद्भवलेले तांत्रिक बिघाड यासारख्या गोष्टींमुळे सर्रास अपघात घडतात.


बातमी अपडेट होत आहे. 


हेही वाचा