बार्देश : पर्वरी येथे नवरत्न रेस्टॉरन्टजवळ अपघात; ट्रकखाली येऊन महिलेचा मृत्यू

अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
21st October, 04:15 pm
बार्देश : पर्वरी येथे नवरत्न रेस्टॉरन्टजवळ अपघात; ट्रकखाली येऊन महिलेचा मृत्यू

म्हापसा : तीन बिल्डींग, पर्वरी येथिल नवरत्न रेस्टॉरन्टजवळ दुचाकीला ट्रकची धडक लागून त्याखाली आल्याने विजया मुरगावकर (४५ रा. सिरीन-चिंबल) ही महिला ठार झाली. तर दुचाकीस्वार हिरालाल मुरगावकर (५५) हे किरकोळ जखमी झाली.

समोर आलेल्या माहितीनुसार हा अपघात सोमवारी २१  रोजी सकाळी ९.१५ च्या सुमारास घडला. जखमी हिरालाल मुरगावकर हे आपल्या भावजयीला घेऊन जीए ०७ व्ही ५२०५ क्रमांकाच्या अ‍ॅक्सेस स्कुटरवरून पणजीहून म्हापसाच्या दिशेने येत होते. तर त्याच दिशेने मोहम्मद अफजल हा जीए ०५ टी ७९७९ क्रमांकाचा ट्रक घेऊन येत होता.


 ही दोन्ही वाहने घटनास्थळी नवरत्न रेस्टॉरन्टजवळ पोचली असता ट्रकची दुचाकीला धडक लागली. त्यामुळे दुचाकीस्वाराचा दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यावेळी मागे बसलेली विजया ही ट्रकखाली आली व तिच्या शरीरावरून ट्रकचे चाक गेले. यात ती गंभीर जखमी झाली. दरम्यान रूग्णवाहिकेतून गोमेकॉत दाखल केले असता डॉक्टरांना तिला मृत घोषित केले. या अपघातावेळी दुचाकीसह दुचाकीस्वार उजव्या बाजूने रस्त्यावर कोसळला आणि किरकोळ जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पर्वरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक अरूण शिरोडकर व हवालदार विशाल गावस यांनी पंचनामा केला. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. 


     

दरम्यान, काल रात्री ११:३० वाजता केपे येथे भीषण अपघात घडला. स्कोडा कारने दुचाकीला धडक दिल्याने आलीशान स्कोडा कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात अब्दुल कादर बादशाह याचा मृत्यू झाला तर सुफियान शेख हे गंभीर जखमी झाले.


 


मिळालेल्या माहितीनुसार, सदर कारच्या चालकाने घटनास्थळांवरून पलायन केले. चालकाची ओळख पटवण्याच्या प्रयत्नात स्थानिकांनी कारमध्ये डोकावून पाहिले असता त्यांना गांजा सदृश पदार्थ आढळून आला. नशेच्या अमलाखाली गाडी चालवल्यानेच हा अपघात घडला असावा असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला. दरम्यान पोलिसांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी पोहचत पंचनामा केला तसेच अपघातास कारणीभूत गाडी देखील जप्त केली.







दरम्यान कालच,  रविवार दि. २० रोजी पहाटे ४.३० वाजता नवीन मांडवी पुलावर एका दुचाकी चालकाने दुसऱ्या वाहनांना ओव्हरटेक करण्याच्या नादात आपली दिशा सोडून समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालक मसूद सावकार (३१, बेती - बार्देश) गंभीर जखमी झाले. त्यांना लगेच १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांना १०३ वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. 
हेही वाचा