भरलेले पापलेट

Story: चमचमीत रविवार |
20th October, 12:06 am
भरलेले पापलेट

साहित्य :  

दोन जोडी मध्यम पापलेट, दीड वाटी कोथिंबीर, एक वाटी पुदिना, पाच-सहा हिरव्या मिरच्या, दहा-बारा लसणाच्या पाकळ्या, दोन चमचे लिंबाचा रस, पाव चमचा मिरपूड, एक नारळ किसलेला, एक लहान कांदा, मीठ चवीनुसार, अर्धी वाटी तेल, दोन मोठे चमचे रवा, पाव चमचा हळद.

कृती :  

पापलेट साफ करून पोटाच्या बाजूने उभी चिर देऊन अख्खेच ठेवावेत. डोक्याकडचा व कल्ल्याकडचा भाग साफ करून घ्यावा. पापलेट साफ करून त्याला मीठ, हळद, लिंबू रस चोळून बाजूला ठेवावे. कोथिंबीर, मिरच्या, पुदिना, लसूण, मिरपूड कांदा व खोवलेला नारळ बारीक वाटून घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ व लिंबू रस घालून सुकी चटणी वाटावी. चीर दिलेल्या पापलेटमध्ये ही चटणी दाबून भरावी. पापलेटला वरुनही ही थोडी चटणी लावून घ्यावी आणि रव्यात घोळवून हे पापलेट तव्यावर तेल सोडून भाजायला ठेवावे. 

गरमागरम खायला घ्यावे.


कविता आमोणकर