आजही अटकेसाठी आंदोलन सुरूच, आंदोलकांनी राज्यातील विविध पोलीस स्थानकांत जात दिली वेलिंगकरांच्या अटकेसाठी निवेदने.
पणजी : सुभाष वेलिंगकर यांनी 'गोयंच्या साहेबा'संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात काल शनिवारी अनेक ठिकाणी ख्रिस्ती बांधवांनी आंदोलने केली. दुपारपर्यंत या आंदोलनाने किंचित हिंसक वळण घेतले. यावेळी मडगाव भागात रास्तारोको करण्यात आला. दुपारी शाळेतून मुलांना आणायला जाणाऱ्या पालकांची तसेच इतर प्रवाशांची अडचण झाली. दरम्यान आंदोलकांनी एकाशी हुज्जत घालत त्यास मारहाणदेखील केली.
सायंकाळ पर्यंत आंदोलकांनी कदंब बस देखील अडवून ठेवल्या. वेलिंगकरांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता तो फेटाळण्यात आला. फादर परेरा, डॉ. रीबेलो आणि इतरांनीही समाजातील सलोखा बिघडू न देण्याचे आवाहन केले. रात्री मुख्यमंत्र्यांनी वेलिंगकरांवरदेखील फादर बोल्मेक्स यांच्यासारखीच कारवाई केली जाईल असे म्हटले. रात्री उशिरा मडगाव परिसरात पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला.
* आज पुन्हा ख्रिस्ती बांधवांनी राज्यातील विविध भागातील पोलीस स्थानकांत जात वेलिंगकरांच्या अटकेसाठी निवेदने देण्यास सुरुवात केली.
* वेलिंगकरांना पकडण्यासाठी पोलीस महाराष्ट्रात
सुभाष वेलिंगकर यांना पकडण्यासाठी गोवा पोलिसांची राज्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मोहीम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच वेलिंगकरांना लवकरात लवकर पकडण्याची पोलिसांनी हमीदेखील दिली.
* दरम्यान हिंदूंनी म्हापसा येथील बोडगेश्वर मंदिराजीक वेलिंगकरांच्या समर्थनार्थ सभा घेऊन सरकारवर दडपशाहीचा आरोप केला.
*मडगावातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओल्ड मार्केट परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
*दरम्यान सुभाष वेलिंगकर यांच्या घराच्या दारावर गोवा पोलिसांकडून दुसरी नोटीस चिकटवण्यात आली.
*वेलिंगकर यांच्या अटकेच्या मागणीसाठी मडगावात आंदोलक पुन्हा एकत्र जमले. यावेळी पोलिसांनी त्यांना रास्ता रोको न करण्याचे आवाहन केले.
*सुभाष वेलिंगकर यांच्या अटकेच्या मागणीसाठी जुने गोवे पोलीस स्थानकावर सर्वधर्मीय भाविकांची गर्दी केली. जुने गोवे, दिवाडी, माशेलमधील भाविकांनी पोलिसांना निवेदन दिले.
* वेलिंगकर यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन करत रास्ता रोको करून नागरिकांना त्रास दिल्याप्रकरणी प्रतिमा कुतिन्हो, साविओ कुतिन्होसह सुमारे ५०० जणांवर फातोर्डा पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आला.
* पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने अखेर मडगावातील आंदोलन मागे घेण्यात आले. राज्यात शांतता अबाधित राखण्यासाठीच आंदोलन घेतल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
*वेलिंगकर प्रकरणात चर्चकडून पत्रक जारी!
सुभाष वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे केवळ ख्रिस्तीच नव्हे तर इतर धर्मीयांच्या भावनाही दुखावल्या. राज्य सरकारने वेलिंगकरांवर कायद्यानुसार कारवाई करावी : फादर सावियो फर्नांडिस, कार्यकारी सचिव, 'सीएसजेपी'
बातमी अपडेट होत आहे..