बांबोळी : धावत्या ट्रकचे चाक सुटून बाजूने जाणाऱ्या दुचाकीवर धडकले. दुचाकीस्वार गंभीर.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
05th October 2024, 04:13 pm
बांबोळी : धावत्या ट्रकचे चाक सुटून बाजूने जाणाऱ्या दुचाकीवर धडकले. दुचाकीस्वार गंभीर.

बांबोळी : येथील गोमेकॉनजीकच्या उड्डाणपुलाच्या सुरवातीलाच आज दुपारी घडलेला विचित्र अपघात एका गाडीतील प्रवाशाने मोबाइलमध्ये कैद केला. दक्षिणेहून पणजीच्या दिशेने येणाऱ्या एका अवजड मालवाहू ट्रकची डाव्या बाजूची चाके तांत्रिक बिघाडामुळे चेसीजपासून वेगळी झाली. यातील एक चाक याच ट्रकच्या मागून येणाऱ्या दुचाकीला धडकले. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. बाजूनेच जाणाऱ्या प्रवाशांनी आपल्या गाड्या थांबत त्यास आधार दिला. 

दरम्यान, या व्हीडिओच्या शेवटी ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा करून ट्रक चालक बाहेर पडत घटनास्थळावरून पळ काढताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोकांच्या क्षुब्ध प्रतिक्रिया येत आहेत.  

दरम्यान राज्यात अपघातांचा ससेमिरा सुरूच आहे. बेदरकारपणे वाहन चालवणे, रस्त्यावरील खड्डे, वळणाचा अंदाज न आल्याचे गाडीचा अपघात, किंवा दारूच्या नशेत गाडी चालवणे तसेच गाडीत उद्भवलेले तांत्रिक बिघाड यासारख्या गोष्टींमुळे राज्यात सर्रास अपघात घडतात. आज केवळ दैव बलवत्तर म्हणून दुचाकी चालकाचा जीव वाचला. 

बातमी अपडेट होत आहे 


हेही वाचा