सत्तरी : मलपण परिसराला चक्रीवादळाचा फटका

एका घराचे नुकसान : नऊ ठिकाणी रस्त्यांवर झाडे पडून वाहतूक ठप्प

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
02nd October, 12:48 am
सत्तरी : मलपण परिसराला चक्रीवादळाचा फटका

घराचे कोसळलेले छप्पर हटवताना वाळपई अग्निशामक दलाचे जवान.

वाळपई : मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास खोतोडा पंचायत क्षेत्रातील मलपण भागाला चक्रीवादळाचा फटका बसला. यात एका घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नऊ ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. वाळपई व फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी झाडे हटविली.
खोतोडा पंचायत क्षेत्रातील मलपण येथील रस्त्याच्या बाजूला असलेल्या सुमारे पाचशे मीटर अंतरावरील भागाला चक्रीवादळाचा फटका बसला. रोहिदास गावकर यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील छपराचा भाग पूर्णपणे कोसळला. वाऱ्यामुळे सदर छप्पर खाली कोसळले. त्याचप्रमाणे तळमजल्यावरही नुकसान झाले.
वाळपई-मलपण व मलपण-मोले या प्रमुख रस्त्यांवर नऊ ठिकाणी झाडे पडली होती. याबाबतची माहिती वाळपई व फोंडा येथील अग्निशामक दलाला देण्यात आली. दोन्ही दलांच्या जवानांनी सुमारे दीड तासात रस्ते मोकळे केले.       

हेही वाचा