दहावीचा पेपर संपल्यानंतर घरी जाणाऱ्या विद्यार्थ्याला म्हार्दोळात मारहाण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19 mins ago
दहावीचा पेपर संपल्यानंतर घरी जाणाऱ्या विद्यार्थ्याला म्हार्दोळात मारहाण

फोंडा : म्हार्दोळ पोलीस स्थानकाच्या हद्दीत बुधवारी दुपारी दहावीचा पेपर संपल्यानंतर घरी जात असलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली. मारहाण करणारे ४ अल्पवयीन विद्यार्थी तिसवाडी तालुक्यातील आहेत. या प्रकरणी म्हार्दोळ पोलीस स्थानकात ४ अल्पवयीन विद्यार्थ्यांविरोधात तक्रार देण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, बुधवारी एक विद्यार्थी दुपारी १ वाजता दहावीचा पेपर संपल्यानंतर घरी जात होता. त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या अन्य ४ विद्यार्थी आणि त्या स्थानिक विद्यार्थ्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. त्यानंतर ४ विद्यार्थ्यांनी त्या स्थानिक विद्यार्थ्याला मारहाण केली. जखमी अवस्थेत त्या विद्यार्थ्याला इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचार केल्यानंतर घरी पाठवण्यात आले. या प्रकरणी म्हार्दोळ पोलीस स्थानाकात तक्रार देण्यात आली असून निरीक्षक योगेश सावंत याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.