फोंडा मतदारसंघात रवी सर्वाधिक ६ वेळा विजयी

मुक्तीनंतरच्या १४ निवडणुकांपैकी ६ वेळा रवींची सरशी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
21 mins ago
फोंडा मतदारसंघात रवी सर्वाधिक ६ वेळा विजयी

पणजी : निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचा (Congress) उमेदवारही जाहीर झाल्याने फोंड्यात (Ponda) पोटनिवडणुकीची (By-election)  रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. गोव्याचे (Goa) लाडके पात्रांव असलेले स्व. रवी यांची फोंड्यावर मजबूत पकड होती, हे आजपर्यंतच्या निकालांवर नजर टाकल्यास सहज लक्षात येते.

पोर्तुगीज राजवटीतून गोवा १९६१ साली मुक्त झाला. गोवा मुक्त झाल्यानंतर पहिली विधानसभा (Assembly)  निवडणूक (Election) १९६३ साली झाली. आजपर्यंत फोंडा मतदारसंघात विधानसभेच्या १४ निवडणुका झाल्या आहेत. आता होणारी पोटनिवडणूक ही १५वी आहे. १४ वेळा झालेल्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक ६ वेळा स्व. रवींनी विजय मिळविला आहे.

सर्वप्रथम १९८४ साली स्व. रवी नाईक हे फोंडा मतदारसंघातून मगोच्या उमेदवारीवर विजयी झाले होते. तद्नंतर १९८९ची विधानसभा निवडणूक त्यांनी मडकई मतदारसंघातून लढवली होती. मगोतून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले.

१९९९, २००२ व २००७ अशा सलग तीन विधानसभा निवडणुका त्यांनी फोंडा मतदारसंघातून जिंकल्या. २०१२च्या विधानसभा निवडणुकीत मात्र मगोचे लवू मामलेदार यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर २०१७च्या निवडणुकीत फोंडा मतदारसंघातून ते पुन्हा विजयी झाले. सर्वात शेवटची २०२२ची निवडणुकीत ते फोंड्यातून भाजपच्या उमेदवारीवर विजयी झाले. यापूर्वी मगोचे स्व. रोहिदास नाईक व स्व. शिवदास वेरेकर यांनाच प्रत्येकी दोन वेळा फोंड्यातून विजय प्राप्त झाला होता.

हेही वाचा