स्थानिकांनी गाडी पकडून केली मोपा पोलिसांच्या स्वाधीन

पेडणे : पेडणे तालुक्यातील (Pernem Taluka) कासारवर्णे गावातून कर्नाटकच्या (Karnataka) गाडीतून (Vehicle) गुरे पळवून नेताना स्थानिकांनी रंगेहात पकडली. नंतर गाडी मोपा पोलिसांच्या (Mopa Police) ताब्यात दिली. कासारवर्णे सरकारी हॉस्पिटल जवळ पहाटे २.५० वाजता ही घटना घडली.
काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी रस्त्यावर किंवा रस्त्याच्या बाजूला बसलेली गुरे आणि रस्त्याच्या बाजूच्या गोठ्यातील गुरे गायब होत होती. अधून मधून बिपटा वाघ फिरत असल्याने त्याच्यावर संशय होता. मात्र, आता गुरे घेऊन जाणारी गाडी पकडल्यानंतर खरे कारण समजल्याची माहिती स्थानिकांनी दिली. गाड्यांत कोंबून गुरे नेली जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
आणि गाडी पकडली
दरम्यान, जंगली प्राण्यांकडून शेतीची नासाडी केली जात आहे. त्याचा जबर फटका शेतकरी बांधवांना बसत आहे. रानडुक्कर, गवे रेडे रात्रीच्या वेळी शेतीची नासाडी करत असतात. त्यांना हाकलून लावण्यासाठी शेतकरी गंडेल किंवा डबे वाजवून रात्रभर आळीपाळीने रोज शेतीची राखण करीत असतात.
रात्री फिरत असलेल्या या गाडीचा त्यांनी पाठलाग केल्यानंतर गुरे कोंबून नेत असल्याचे दिसून आले. त्यानंतर गाडी पकडून मोपा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली. दरम्यान, यासंदर्भात मोपा पोलीस अधिक तपास करीत आहेत.