
पणजी : विधानसभेच्या (Assembly) फोंडा पोटनिवडणुकीसाठी (Ponda By-election) काँग्रेसची (Congress) उमेदवारी अपेक्षेप्रमाणे डॉ. केतन भाटीकर (Dr. Ketan Bhatikar) याना जाहीर झाली आहे. सोमवारी झालेल्या काँग्रेसच्या निवडणूक समितीच्या बैठकीत डॉ. केतन भाटीकर यांच्या एकाच नावाची शिफारस करण्यात आली होती.
राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी डॉ. केतन भाटीकर यांच्या उमेदवारीला मान्यता दिल्याचे अ. भा. काँग्रेस समितीने जाहीर केले आहे. माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे रिकाम्या झालेल्या फोंडा मतदारसंघाच्या जागेसाठी ९ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. आचारसंहिता लागू झाली असून २३ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असेल.
भाजपची उमेदवारी रवी नाईक यांचे सुपूत्र रितेश नाईक याना मिळण्याची दाट शक्यता असल्याने रितेश विरूद्ध डॉ. केतन भाटीकर अशा लढतीची अपेक्षा आहे. भाजप उमेदवाराची घोषणा दोन दिवसाiत जाहीर होणार असल्याचे प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले आहे.