काबुल हल्ल्यानंतर अफगाणिस्तानकडून पाकिस्तानविरोधात ‘जिहाद’ची घोषणा

तणाव तीव्र

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
24 mins ago
काबुल हल्ल्यानंतर अफगाणिस्तानकडून पाकिस्तानविरोधात  ‘जिहाद’ची घोषणा

काबुल : अफगाणिस्तानातील (Afghanistan)  काबुल (Kabul) येथे रुग्णालयावर झालेल्या भीषण हवाई हल्ल्यानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील तणाव अत्यंत तीव्र झाला असून, अफगाणिस्तानच्या ग्रँड मुफ्तींनी पाकिस्तान सैन्याविरोधात ‘जिहाद’चे (Jihad) आवाहन करणारा फतवा जारी केला आहे.

अफगाणिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court)  ग्रँड मुफ्ती शेख मौलवी अब्दुल रऊफ यांनी हा फतवा जाहीर करत, सर्व लढाऊ वयोगटातील मुस्लिमांनी पाकिस्तान सैन्याविरोधात युद्धात सहभागी होणे “अनिवार्य” असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या घोषणेमुळे परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सोमवारी सायंकाळी काबुलमधील व्यसनमुक्ती उपचार केंद्रावर झालेल्या हवाई हल्ल्यात किमान ४०० जणांचा मृत्यू झाला होता. २५० हून अधिक जखमी झाले होते. या घटनेनंतर अफगाणिस्तानातील धार्मिक संस्था (Religious oraganisations)  आणि तालिबान सरकार पाकिस्तानविरोधात एकवटल्याचे दिसून येत आहे.

 अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाने या हल्ल्याला “मानवतेविरुद्ध गुन्हा” ठरवत पाकिस्तानला याचे योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही दिला आहे. 

युद्धजन्य परिस्थिती तीव्र

दरम्यान, या घटनेमुळे काबुल आणि इस्लामाबाद यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा