बोरी : सिद्धनाथ मंदिरात जायांची पूजा संपन्न

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th September, 04:36 pm
बोरी : सिद्धनाथ मंदिरात जायांची पूजा संपन्न

फोंडा : समुद्रसपाटीपासून सुमारे १२५० फूट उंचीवर असलेल्या बोरी येथील सिध्दनाथ पर्वतावरील मंदिरात जायांच्या पूजेचा उत्सव गुरूवारी विविध भागातील भाविकांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा करण्यात आला. जायांच्या सुगंधी फुलांनी श्री सिध्दनाथाचा गाभारा सजवण्यात आला होता. 

 उत्सवानिमित्त सकाळी श्री सिध्दनाथ देवाच्या स्वयंभूलिंगावर अभिषेक, पूजा व अन्य विधी संपन्न झाल्या. दुपारी आरत्या व प्रसाद, सायंकाळी जायांची पूजा झाल्यावर भजनाच्या कार्यक्रमात दत्तात्रय देवारी, दामोदर च्यारी, आनंद नाईक, दिगंबर देवारी, रामचंद्र पेडणेकर, नमेश बोरकर, जतीन बोरकर, कृष्णकुमार नाईक, अमर देसाई, फडते, देवानंद देसाई, शाम प्रभुदेसाई , मिलिंद देवारी आदींनी भजन सादर केले.  या उत्सवात विविध भागातील भाविकांनी भाग घेतला होता. 


हेही वाचा