‘समग्र शिक्षा’अंतर्गत ८३ जागांवर केली जाणार भरती

वर्षभराच्या कंत्राटी पद्धतीने भरणार सर्व पदे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
5 hours ago
‘समग्र शिक्षा’अंतर्गत ८३ जागांवर केली जाणार भरती

पणजी : शिक्षण खात्यातर्फे समग्र शिक्षाअंतर्गत ८३ जागांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये ६० जागा एनएफक्यूएफचे विविध विषय शिकवण्यासाठीच्या आहेत. यात ब्लॉक आणि क्लस्टर रिसोर्स व्यक्ती पदांसाठी १९ जागा, एमआयएसच्या २, तर डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि मल्टीटास्कर (ड गट) या पदांच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. सर्व पदे एक वर्षाच्या कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील. या पदांसाठी वॉक इन इंटरव्यू २५ ते ३० सप्टेंबर दरम्यान शिक्षण खात्याच्या समग्र शिक्षा अभियानच्या कार्यालयात सकाळी ९.३० वा. होतील.
एनएफक्यूएफचे विविध १२ विषय शिकवण्याच्या पदांच्या ६० पैकी १३ जागा पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी या विषयाच्या आहेत. एपॅरलच्या ७, आरोग्य सेवा विषयासाठी ६, कृषी, इलेक्ट्रॉनिक आणि ऑटो मोटिव्ह विषयाच्या प्रत्येकी ५, ब्युटी आणि वेलनेसच्या ४, कन्स्ट्रक्शन, प्लंबिंग, बँकिंग, लॉजिस्टिक आणि रिटेल या विषयासाठीच्या प्रत्येकी तीन जागा आहेत. सर्व जागांसाठी महिन्याला २० हजार रुपये वेतन असणार आहे. यासाठी २७ आणि ३० सप्टेंबर रोजी मुलाखती होतील. या पदांसाठी शाखेनुसार बीई, डिप्लोमा किंवा पदवी असणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी वॉक इन इंटरव्यूसाठी किमान अर्धा तास आधी उपस्थित राहणे आवश्यक आहे. १० नंतर येणाऱ्या उमेदवारांना वॉक इन इंटरव्यूसाठी घेण्यात येणार नाही. उमेदवारांनी रहिवासी दाखल्यासह अन्य आवश्यक कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी www.scert.goa.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन समग्र शिक्षाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी केले आहे.
ब्लॉक, क्लस्टर रिसोर्स पदांसाठी १९ जागा
ब्लॉक रिसोर्स व्यक्ती १३ जागांसाठी २५ सप्टेंबर रोजी मुलाखत होणार आहे. या पदासाठी महिन्याला २५ हजार रुपये वेतन देण्यात येईल. या पदासाठी बीएड किंवा एमएड पदवी असणे तसेच २ ते ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. क्लस्टर रिसोर्स व्यक्ती पदाच्या ६ पदांसाठी २६ सप्टेंबर रोजी मुलाखत होणार आहे. या पदासाठी महिन्याला २० हजार रुपये वेतन देण्यात येईल. या पदासाठी डीएड किंवा बीएड पदवी असणे तसेच एका वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.            

हेही वाचा