म्हादईचे पाणी वळवण्यासाठी ‘कळसा-भांडुरा’ला मान्यता द्या

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
म्हादईचे पाणी वळवण्यासाठी ‘कळसा-भांडुरा’ला मान्यता द्या

पणजी : म्हादईचे पाणी वळवण्यासाठी कळसा-भांडुरा प्रकल्पाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने मान्यता द्यावी, अशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. 

पाणी तसेच वीज यांसारखे आंतरराज्य प्रश्न सहकार्याने सुटावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. कळसा-भांडुरा प्रकल्पाला मान्यता मिळाल्यास गोव्याला वीज पुरवठा करणाऱ्या तमनार प्रकल्पाला कर्नाटक परवानगी देईल असे सिद्धरामय्या यांनी म्हटले.कळसा-भांडुरा प्रकल्पातून म्हादईचे पाणी वळवण्याचा कर्नाटकचा प्रयत्न आहे. याला गोव्याचा विरोध आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी म्हादई लवादाची स्थापना करण्यात आली होती. म्हादई लवादाच्या निर्णयाला गोव्यासह कर्नाटकनेही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. म्हादईचा वाद न्यायालयात प्रलंबित असतानाही कर्नाटकने पाणी वळवण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.