डिचोली : गांजा बाळगल्या प्रकरणी एकास अटक

स्कूटरसह ९० ग्रॅम गांजा जप्त

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
16th September, 04:42 pm
डिचोली : गांजा बाळगल्या प्रकरणी एकास अटक

डिचोली : अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत डिचोली पोलिसांनी कारवाई करत आयडीसी परिसरात राहणाऱ्या शाहीर राजासाहब शैनावर (३५)मूळ कर्नाटक याला ताब्यात घेतले असून त्याच्याजवळ असलेल्या ९० ग्रॅम गांजासह  संशयिताची दुचाकी देखील जप्त केली आहे . सिटी बायपासच्या जंक्शनवर डिचोली पोलिसांनी ही कारवाई केली या अंतर्गत सदर इसम विरोधा त गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी पोलिस कस्टडी ठेवले आहे.

 उपनिरीक्षक विकेश  हडफडकर,आकाश शिंदे, निलेश फोगेरी, जयेश खांडेपारकर, अनिकेत परब मयूर आसोलकर यांनी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल तसेच उपअधीक्षक सागर एकोस्कर व निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. दरम्यान डिचोली पोलिसांनी गुरुवारी एका मंदिरात फंड पेटी फोडून चोरी केलेला इसमास अटक केल्यानंतर त्याच्याकडून चोरीस नेलेली रक्कम जप्त करण्यात यश मिळवले असून सदर इसमास दोन दिवसाची रिमांड घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे

हेही वाचा