फोंडा : गांजे -उसगाव येथील 'त्या' हिट अँड रन प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
17th September, 03:11 pm
फोंडा : गांजे -उसगाव येथील 'त्या' हिट अँड रन प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

फोंडा : गांजे -उसगाव येथे अज्ञात वाहनाची धडक बसून बाबल गणपत गावडे (२१, आंबेली - सत्तरी) हा स्कुटर चालक गंभीर जखमी झाला होता. त्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.  फोंडा पोलिसांनी सोमवारी रात्री अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जीए -०४-पी - ४७८९ क्रमांकांची स्कुटर घेऊन बाबल गावडे हा उसगाव येथून वाळपई येथे जात होता. गांजे येथे पोहचताच अज्ञात वाहनाची धडक बसून स्कुटर चालक गंभीर जखमी झाला . स्थानिक लोकांनी  त्याला खासगी वाहनातून पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. त्यानंतर येथून अधिक उपाचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले . 

सध्या त्याची स्थिती गंभीर असल्याने सोमवारी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. अज्ञात वाहन चालकाचा शोध फोंडा पोलीस घेत आहे. हवालदार रघुनाथ गावस यांनी पंचनामा केला असून निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहे.

हेही वाचा