फोंडा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; म्हार्दोळ पोलिसांकडून एकास अटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
17th September, 02:23 pm
फोंडा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; म्हार्दोळ पोलिसांकडून एकास अटक

फोंडा :  १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी लक्ष्मण बोरकर ( ४५- मडकई) याला अटक केली आहे. अटक केलेल्या संशयीताला न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. म्हार्दोळ पोलिसांनी अटक केलेला संशयीत सरकारी कर्मचारी आहे. 

सदर घटना पाच दिवसांच्या  गणेश विसर्जनाच्या वेळी घडली होती.  या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने रीतसर पोलीस तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी संशयीताला अटक केली आहे. निरीक्षक योगेश सावंत याप्रकरणी तपास करत आहेत. 


हेही वाचा