पेडणे : विर्नोडा येथे उड्डाणपुलावर लॉरीची कोंबडीवाहक टेम्पोला धडक; एकजण ठार तर दोघे जखमी

गेल्या तीन दिवसांत राज्यात ४ भीषण अपघात घडले. यात तब्बल ५ जणांचा मृत्यू झाला तर ५ जण जखमी झालेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
16th September, 09:31 am
पेडणे : विर्नोडा येथे उड्डाणपुलावर लॉरीची कोंबडीवाहक टेम्पोला धडक; एकजण ठार तर दोघे जखमी

विर्नोडा-पेडणे :  विर्नोडा येथील सरकारी कॉलेजसमोरील उड्डाणपुलावर आज पहाटे चारच्या दरम्यान हिट अँड रनचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. कोंबडी घेऊन जाणाऱ्या मालवाहक टेम्पोला मागून अज्ञात लॉरीने धडक दिली. या भीषण धडकेच्या परिणामस्वरूप मालवाहक टेम्पोच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व तो उलटला. यात गंभीर जखमी झालेल्या टेम्पो चालक नियाझ झारी (३८) यांना इस्पितळात नेत असताना वाटेत मृत्यू झाला तर अन्य दोघा जखमींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघातास कारणीभूत ठरलेल्या लॉरीचा शोध देखील पोलिसांनी सुरू केला आहे



चतुर्थीचा उत्साह ओसरण्याआधीच राज्यात घडलेल्या भीषण अपघाताने जनसामन्यांना हादरवून टाकले आहे.  गेल्या ३ दिवसांत घडलेल्या ४ अपघातांत ५ जणांचा मृत्यू  तर ५ जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.  


* मांद्रेत घडलेल्या भीषण अपघातात सानिका सुभाष खर्बे (१९) आणि प्रियंका संदेश खर्बे (२९) यांचा मृत्यू झाला होता तर सिद्धी हनुमंत शेटकर ही युवती गंभीर जखमी झाली होती. 



* पेठवाडा नानोडा येथील एका वळणावर कार आणि दुचाकी  यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील प्रतीक कानोळकर (२२, कानोळकरवाडा नानोडा) आणि लक्ष्मण मळीक (१९, वरचावाडा नानोडा) हे जागीच ठार झाले.


नानोडा अपघातात ठार झालेल्या दोन्ही युवकांवर अंत्यसंस्कार


* दरम्यान, काकोडा-कुडचडे येथे दोन दुचाकींच्या अपघातात दोघे जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. 



राज्यात रस्ते अपघातांत जीवास मुकणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.  बहुतांशी अपघात हे वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यानेच घडत असल्याचे पोलीस तपासात  उघड झाले आहे. राज्यात पोलिसांकडून नागरिक तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागृती केली जात आहेत. मात्र, खराब रस्ते व रस्त्याचे चुकीच्या पद्धतीने बांधकाम, वाहनचालकांची बेफिकिरी आणि निष्काळजी, वाहतूक नियमांचे उल्लंघन अशा अनेक कारणांमुळे अजूनही अपघात घडत आहेत. 


Goa accidents kill 165 in 2024's first half but crash count dips | Goa News  - Times of India


एकाआकडेवारीनूसार राज्यात १ जानेवारी ते १४ सप्टेंबर २०२४ या २५८ दिवसांच्या कालावधीत सुमारे १,८२४ अपघातांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी पाहता दिवसाकाठी ७ अपघात, तर सरासरी ३१ तासांत एकाचा अपघाती मृत्यू होत आहे.अपघात रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत असल्या तरी अपघातांचे प्रमाण कमी झालेले दिसत नाही.


बातमी अपडेट होत आहे 

हेही वाचा