धारबांदोडातील डोंगरकापणी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th September, 12:29 am
धारबांदोडातील डोंगरकापणी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

फोंडा : पिळये - धारबांदोडा येथील सर्व्हे क्र. ४२/२ या जागेवर डोंगरकापणी केल्याप्रकरणी स्वानंद कन्सल्टंट आणि इंजिनियर्स कंपनीचे संचालक समीर आनंद वाचासुंदर (पर्वरी) यांच्याविरोधात फोंडा पोलिसांनी शनिवारी रात्री गुन्हा नोंद केला आहे. धुल्लई - धारबांदोडा येथे सुद्धा डोंगर कापणी विरोधात लवकरच जागेच्या मालकाच्या विरोधात गुन्हा नोंद होण्याची शक्यता आहे.

पिळये - धारबांदोडा येथील सर्व्हे क्र. ४२/२ या जागेवर डोंगरकापणी केल्याचे उघडकीस आल्यानंतर नगरनियोजन खात्याचे अधिकारी शैलेश नाईक यांनी दि. १३ ऑगस्ट रोजी फोंडा पोलीस स्थानकात समीर आनंद वाचासुंदर यांनी बेकायदेशीरपणे डोंगर कापणी केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी यासंबंधी अधिक चौकशी करून संशयिताविरोधात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद केला. पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन नाईक या प्रकरणी तपास करीत आहेत.

पिळयेबरोबर धुल्लई येथील सर्व्हे क्र. १५७/१ या जागेवर बेकायदेशीरपणे डोंगर कापणी करून प्लॉट विक्री करण्याचा प्रयत्न फसला होता. भरारी पथकाने छापा टाकून जागेवर बेकायदेशीरपणे सुरू असलेले काम बंद पाडले होते. यासंबंधी सुद्धा फोंडा पोलीस स्थानकात जागेचे मालक मनोहर घनश्याम गावकर (दावकोण) यांच्याविरोधात नगरनियोजन खात्याच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. लवकरच जागेच्या मालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

हेही वाचा