वागातोरमधील कोमुनिदादच्या जागेतील बांधकामे जमीनदोस्त

यापूर्वी कोमुनिदादने ही बांधकामे रिकामी करण्याची बजावली होती नोटीस

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
21 hours ago
वागातोरमधील कोमुनिदादच्या जागेतील बांधकामे जमीनदोस्त

म्हापसा: वागातोर येथे कोमुनिदादच्या जागेवर बांधण्यात आलेली २५ बेकायदा बांधकामे हणजूण कोमुनिदादने पोलीस बंदोबस्तात जमिनदोस्त केली. यापूर्वी कोमुनिदादने ही बांधकामे रिकामी करण्याची नोटीस बजावली होती. मात्र संबंधितांनी ती खाली केली नसल्याने ही कारवाई करण्यात आली.

हणजूण मधील सर्वे क्रमांक २०६/१ मधील कोमुनिदादच्या जागेत बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून त्या ठिकाणी दुकाने, गाळ्यांचे बांधकाम करण्यासह मातीचा भराव टाकून वाहन पार्किंगसाठी जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले होते. ही सर्व बेकायदा बांधकामे जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आली.

या कारवाईबाबत हणजूण कोमुनिदादचे अध्यक्ष डॉम्निक परेरा यांनी सांगितले की, कोमुनिदादच्या जागेत बेकायदेशीररीत्या बांधलेली सुमारे २५ बांधकामे आम्ही जमिनदोस्त केली आहेत. तसेच वाहन पार्किंगसाठी जमिनीत टाकलेला मातीचा भराव देखील काढून जमीन पूर्वपदी आणली आहे.              

हेही वाचा