हरमल किनारी दुसऱ्या दिवशीही अवैध बांधकामांवर ‘हातोडा’

काही स्थानिक व्यावसायिकांनी आपापली बांधकामे हटवण्यास स्वतः पुढाकार घेतला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21 hours ago
हरमल किनारी दुसऱ्या दिवशीही अवैध बांधकामांवर ‘हातोडा’

पेडणे: हरमल समुद्रकिनारी भागात सीआरझेड विभागाचे उल्लंघन करून २०० मीटरच्या आत जी बांधकामे केली होती. त्या बांधकामावर सीआरझेड विभागाने कारवाई करण्यास १७ सप्टेंबर पासून सुरुवात केली होती. ही कारवाई सुरूच असून दुसऱ्या दिवशी तीन बांधकामे मोडण्यात आली आहेत.

एकूण १५ बांधकामावर कारवाई करण्याचा आदेश सीआरझेड विभागामार्फत देण्यात आला होता. त्यानुसार पंचायत संचालकाने पंचायतीला कळवून या बांधकामावर कारवाई करावी अशी सूचना केली. ही बांधकामे मोडण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी यांच्याकडून पोलीस फोर्स, मजूर संबंधित विभागाने पुरवावे असा आदेश दिला होता.

त्यानुसार या हरमल किनारी भागातील सीआरझेड विभागाचे उल्लंघन करून १५ बांधकामे केली होती. त्यातील चार बांधकामे १७ रोजी आणि तीन बांधकामे १८ रोजी मिळून एकूण सात बांधकामे मोडण्यात आली आहोेत. तर उर्वरित आठ बांधकामावर पुढील कारवाई सुरूच राहणार आहे. परंतु काही स्थानिक संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी आपापली बांधकामे हटवण्यास स्वतः पुढाकार घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.            

हेही वाचा