माडेल येथे घरात चोरी, लाखाचे साहित्य लांबवले

चोरांनी घरातील साहित्याची तोडफोडही केली

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21 hours ago
माडेल येथे घरात चोरी, लाखाचे साहित्य लांबवले

मडगाव : माडेल ग्रँड मडगाव येथील वॉल्टर रिबेलो यांच्या घरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास चोरी झाली. चोरट्यांनी घरातील कपडे, भांडी व इतर साहित्य चोरी करत मोडतोडही केली. यात सुमारे एक लाखांचे साहित्य चोरीला गेल्याचा दावा मालकाने केलेला आहे. फातोर्डा पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माडेल ग्रँड येथील वॉल्टर रिबेलो यांच्या राहत्या घरात खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. त्यानंतर घरातील रोजच्या वापरातील साहित्य, फर्निचर, कपडे, भांडी असा माल चोरी करून नेला. याशिवाय घरातील साहित्याची तोडफोडही केलेली आहे.

चोरी झाल्याचे समजताच रिबेलो यांनी फातोर्डा पोलिसांना याची माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली. सायंकाळी उशिरापर्यंत फातोर्डा पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आलेला नव्हता. या चोरीत घरातील सुमारे एक लाखांचे साहित्य चोरीला गेल्याची माहिती रिबेलो यांनी दिली.       

हेही वाचा