बीआयएसमध्ये ३४५ जागांवर भरती प्रक्रिया सुरू; इच्छुक व पात्र उमेदवारांनी असा करावा अर्ज

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
16th September, 12:33 pm
बीआयएसमध्ये ३४५ जागांवर भरती प्रक्रिया सुरू; इच्छुक व पात्र उमेदवारांनी असा करावा अर्ज

मुंबई : ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणजेच BIS मध्ये अ, ब आणि क श्रेणीतील तब्बल ३४५ जागांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवार ३० सप्टेंबरपर्यंत ibpsonline.ibps.in/bisjan24/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात .

पात्रता निकष:

*सहाय्यक संचालक- संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी, ३ ते ५ वर्षांचा अनुभव.

*वैयक्तिक सहाय्यक- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, इंग्रजी आणि हिंदी भाषेतील शॉर्ट हँड आणि संगणक ज्ञान आवश्यक .

*सहाय्यक विभाग अधिकारी- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर, संगणक ज्ञान आवश्यक.

*सहाय्यक- मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५  वर्षांचा अनुभव असलेले पदवीधर.

*स्टेनोग्राफर- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर, संगणक ज्ञान आवश्यक, शॉर्ट हँड.

*वरिष्ठ सचिवालय सहाय्यक- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर, संगणक ज्ञान आवश्यक.

*कनिष्ठ सचिवालय सहाय्यक- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर, संगणक ज्ञान आवश्यक. 

*तांत्रिक सहाय्यक (लॅब) - ६०% गुणांसह ३ = वर्षांचा मेकॅनिकल डिप्लोमा किंवा विज्ञान पदवी.

*तंत्रज्ञ- १० वी पास, संबंधित ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्र, २ वर्षांचा अनुभव.

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही सर्व माहिती घेऊ शकता 

https://www.bis.gov.in/wp-content/uploads/2024/09/advertisement-bilingual-06.09.2024.pdf

वयोमर्यादा:

*सहाय्यक संचालक- कमाल ३५ वर्षे

*वैयक्तिक सहाय्यक, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक- कमाल ३० वर्षे

*स्टेनोग्राफर, सचिवालय सहाय्यक – कमाल २७ वर्षे

*तांत्रिक सहाय्यक- कमाल ३० वर्षे

*तंत्रज्ञ- कमाल २७ वर्षे

BIS Recruitment 2022 Apply Online Scientist B 22 Posts

शुल्क:

सहाय्यक संचालक पदांसाठी अर्ज शुल्क रु. ८०० रुपये आहे.

इतर सर्व पदांसाठी अर्ज शुल्क रु. ५०० 

निवड प्रक्रिया:

ऑनलाइन परीक्षा

कौशल्य चाचणी

मुलाखत

BIS Recruitment 2024 Apply online for BIS Job vacancies at bis.gov.in

पगार:

वेगवेगळ्या पदांसाठी १९,९०० रुपये ते १,७७,५०० रुपये प्रति महिना.

असा करा अर्ज :

अधिकृत वेबसाइट bis.gov.in वर जा.

Apply Online वर क्लिक करा.

नोंदणी करा आणि फी भरा.

फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट घ्या.

BIS Recruitment 2021: 28 Scientist-B vacancies on offer, here's how to  apply - Hindustan Times