आजची तरुणाई आणि योग

मी योगामध्ये सगळ्या चुकीच्या कारणांसाठी शिरलो. पण तुम्ही कुठल्या प्रकारे त्यात जाता, कुठल्या दारातून तुम्ही आत जाता, त्याने काही फरक पडत नाही. जर तुम्ही योग्य गोष्टी केल्या, तर ते काम करते.

Story: विचारचक्र |
15th September, 10:46 pm
आजची तरुणाई आणि योग

प्रश्न : जेव्हा कधी मी माझ्या मित्रांशी योग किंवा ध्यानाबद्दल बोलतो, ते म्हणतात, “अरे नाही, ते तर म्हाताऱ्या लोकांसाठी असते, आपल्याला याची गरज नाही. आम्हाला काही यामध्ये रस नाही.” ध्यान आणि योगाकडे म्हाताऱ्या लोकांनी करण्याची गोष्ट, तरुणांनी नाही, असे का पाहिले जाते? 

सद्गुरू : कदाचित ते फक्त तश्याच लोकांना भेटले असतील. त्यांनी फक्त कॅलेंडरमध्ये योग्यांची जशी चित्र असतात तसेच योगी पाहिले असतील. त्यांना वाटते की योग म्हणजे तुम्हाला जीवनात काहीही रस नाहीये. मी हे मत बदलण्यासाठी शक्य ती हरेक गोष्ट करत आहे. 

एक तरुण मनुष्य म्हणून, असे समजू की तुम्हाला शारीरिक ताकद लागणारे काही शिकायचे आहे, जसे की डर्ट बाईक चालवणे, स्काय डाइव्ह, हेलिकॉप्टर चालवणे किंवा स्की करणे. जे शिकायला तुम्हाला तीन ते पाच वर्ष लागतील, ते मी तीन महिन्यांत करू शकतो. तुम्हाला हे कमी वयात असताना करायचे आहे की मरणाच्या जवळ गेल्यावर. अर्थातच, कमी वयात. मग तुम्ही योग केला पाहिजे!

चुकीची कारणे, बरोबर परिणाम

मी सर्व चुकीच्या कारणांसाठी योग शिकू लागलो. पण जीवनाबद्दल एक मस्त गोष्ट अशी आहे - की जरी तुम्ही चुकीच्या गोष्टींसाठी एखादी बरोबर गोष्ट केली, तरी ती काम करते. जेव्हा मी फक्त अकरा बारा वर्षांचा होतो, तेव्हा आम्ही आमच्या आजोबांच्या गावी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी जायचो. त्या अंगणामध्ये एक विहीर होती, जी आठ फुट रुंद आणि १५० फुट खोल होती. उन्हाळ्यामध्ये, पाणी साधारणपणे जमिनीपासून ६० ते ७० फुटांवर असायचे.

आम्हा लहान मुलांचा एक खेळ म्हणजे या विहिरीत उडी मारून पुन्हा वर चढायचे. जेव्हा तुम्ही उडी मारता, तुम्हाला ते व्यवस्थित करावे लागायचे. नाहीतर, तुमचे डोके भिंतीला लागून फुटू शकते आणि वर येण्यासाठी पायऱ्या नव्हत्या. तुम्हाला दगडांना धरून वर चढावे लागायचे. माझे वजन फार नव्हते, पण तरी माझ्या नखांमधून रक्त येऊ लागायचे, कुठल्या जखमेमुळे नाही, तर केवळ दगडांवर फक्त एक किंवा दोन बोटांनी दाब देऊन वर चढण्यामुळे. पण मी ते करायचो, आणि ते चांगले जमण्याचा मला अभिमान होता.

एक दिवस, एक मनुष्य जो सत्तरहून जास्त वयाचा असेल, तो नुसता उभा राहून आम्हाला शांतपणे पहात होता. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केले कारण आमच्यासाठी सत्तर म्हणजे जवळपास मेल्यात जमा असल्यासारखे होते! मग, एक शब्दही न बोलता, हा मनुष्य आला आणि त्याने विहिरीत उडी टाकली.

मला वाटले की संपला हा, पण तो माझ्याहून जास्त वेगात चढत वर आला! मला ते आवडले नाही. मग मी विचारले, “कसे?” तो म्हणाला, “चला, योग शिका.” एका कुत्र्याच्या पिल्लाप्रमाणे, मी निमुटपणे त्याच्या मागे गेलो. मला तो इतका दैवी वाटला, कारण तो अशा गोष्टी करू शकत होता ज्या कुठल्याही तरुण मनुष्याला करता येणार नाहीत.

मी योगामध्ये सगळ्या चुकीच्या कारणांसाठी शिरलो. पण तुम्ही कुठल्या प्रकारे त्यात जाता, कुठल्या दारातून तुम्ही आत जाता, त्याने काही फरक पडत नाही. जर तुम्ही योग्य गोष्टी केल्या, तर ते काम करते. 

मानवी यंत्रणा 

जर तुमच्याकडे एक सेलफोन किंवा इतर कुठले यंत्र असेल, तर त्याबद्दल तुम्हाला जेवढे जास्त माहीत असते, तेवढे चांगले तुम्ही ते वापरू शकता. इंजिनीयरिंग हे याबद्दलच आहे, की सगळ्या गोष्टींबद्दल आणखी जाणून घेणे, जेणेकरून आपल्याला त्या आणखी चांगल्या बनवता येतील आणि वापरता येतील. हे मानवी यंत्रणेबद्दल का खरे नसेल? याबद्दल तुम्हाला जितके जास्त माहीत असेल, तितके चांगले तुम्ही ते वापरू शकाल. योग याचबद्दल आहे.

या धरतीवर सापडणाऱ्या सर्व यंत्रांपैकी, मानवी यंत्रणा सर्वांत प्रगत यंत्र आहे. मग हे काय आहे याची सर्व गुंतागुंत समजून घेण्यासाठी तुम्ही का लक्ष दिले नाही? याचा अर्थ तुम्हाला युझर्स मॅन्युअल न वाचता जगात धडपडत जायचे आहे. म्हणूनच अगदी शिक्षण सुद्धा, जी सर्वांत सोपी प्रक्रिया आहे, ती इतकी तणावपूर्ण बनत आहे. जर तुम्हाला जगात काही निर्माण करायचे असेल, तर तुम्ही पाहाल कितीतरी जास्त आव्हाने येतील. 

जर तुम्हाला ही मानवी यंत्रणा अगदी व्यवस्थितपणे कशी वापरायची हे माहीत असेल, तर आम्ही म्हणतो की तुम्ही आत्मसाक्षात्कारी आहात. ‘आत्मसाक्षात्कार’ याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वर्गात गेलात. याचा अर्थ तुम्हाला ही मानवी यंत्रणा अगदी उत्तमपणे समजली आहे. तुम्हाला हे काय करू शकते याची संपूर्ण व्याप्ती समजली आहे. मला माझ्या आयुष्यात एवढेच माहीत आहे - मला हा जीवनाचा तुकडा त्याच्या उगमापासून त्याच्या परम शक्यतेपर्यंत माहीत आहे. लोकांना वाटते की मला सगळे काही माहीत आहे; तो त्यांचा प्रश्न आहे. मला फक्त हेच माहीत आहे.

(एक योगी, द्रष्टा, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरू हे भारतातील पहिल्या ५० अतिशय प्रभावशाली व्यक्तींपैकी एक 

आहेत. सदगुरूंना भारत सरकारतर्फे २०१७ मध्ये ‘पद्मविभूषण’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते ४ अब्ज लोकांपर्यंत पोहोचलेल्या कॉन्शस प्लॅनेट - सेव्ह सॉइल (माती वाचवा) या जगातील सर्वात 

मोठ्या लोकचळवळीचे संस्थापक देखील आहेत.)


- सद् गुरू
(ईशा फाऊंडेशन)