धारगळ : पेडणे तालुक्यातील सुकेकुळण-धारगळ येथील आयुष इस्पितळानजीक असलेल्या रेल्वे रुळावर एका ३५-४० वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. स्थानिकांनी याबाबत पोलिसांना कळवले असता, त्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. दरम्यान मडगाव येथून कोकण रेल्वेच्या निरीक्षकांनाही पाचारण करण्यात आले.
प्रथमदर्शी सदर मृतदेह हा परराज्यातील कामगाराचा असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह गोमेकॉत पाठवून दिला आहे. सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने मयताची ओळख पटवणे प्राथमिकदृष्ट्या कठीण बनले आहे. रेल्वे पोलिसांनी विविध शक्यता पडताळून तपासचक्रे गतिमान केली आहेत.
पुढील बातमी अपडेट होत आहे.