माकपचे जेष्ठ नेते व सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
12th September, 05:00 pm
माकपचे जेष्ठ नेते व सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते व सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे नवी दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणी अंती त्यांना न्यूमोनिया झाल्याचे निदान समोर आले. गेले दोन दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होती. दरम्यान आज दुपारी त्यांची प्राणज्योत मावळली. 

Sitaram Yechury blasts Kerala CPI(M) for misinterpreting his speech - India  Today

येचुरी यांचा जन्म १२ ऑगस्ट १९५२ ला मद्रासमध्ये एका तेलुगू भाषिक ब्राह्मण परिवारात झाला होता. त्यांचे वडील सर्वेश्वर सोमयाजुला येचुरी हे आंध्र प्रदेश राज्य रस्ते परिवहन विभागात इंजिनियर होते. तर त्यांच्या आई कल्पकम येचुरी एक सरकारी अधिकारी होत्या. सीताराम येचुरी यांनी नवी दिल्लीच्या प्रेसिडेंट्स एस्टेट स्कुलमध्ये शिक्षण घेतले. पुढे  दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विषयात बीएचे शिक्षण पूर्ण त्यानंतर दिल्लीतील जेएनयू येथे एम.ए. अर्थशास्त्रचे शिक्षण घेतले. आणीबाणीच्या काळात अटक झालेल्या जेएनयूमधील विद्यार्थ्यांमध्ये येचुरी हे देखील होते. जेएनयूत असताना ते राजकारणात सक्रिय झाले. पुढे त्यांनी तीन वेळा जेएनयू विद्यार्थीसंघाचे तीनवेळा अध्यक्षपद देखील भूषवले.  दिग्गज कम्युनिस्ट नेते हरकिशन सिंह सुरजीत यांचा वारसा त्यांनी समर्थपणे सांभाळला. 

Sitaram Yechury Elected as CPI-M's General Secretary, to Serve Second Term  in a Row | India.com

त्यांनी १९९६ दरम्यान  काँग्रेसच्या पी चिदंबरम यांच्यासोबत तत्कालीन आघाडी सरकारसाठी किमान समान कार्यक्रमाचा मसुदा आखला होता. तसेच २००४ साली देखील यूपीएप्रणीत काँग्रेस सरकार सत्तेवर आणण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सर्वोच्च संस्था असलेल्या पॉलिट ब्युरोचे येचुरी तीन दशक सदस्य होते. २००५ ते २०१७ या कालावधीमध्ये राज्यसभा सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. सीताराम येचुरीसारख्या एक धोरणी व्यक्तीमत्वाच्या एक्जिटमुळे भारतीय राजकारणात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.   

Sitaram Yechury elected new CPM general secretary

हेही वाचा