बार्देशात चार वर्षीय विदेशी मुलीवर अत्याचार

संशयित आरोपीला अटक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
11th September 2024, 12:06 am
बार्देशात चार वर्षीय विदेशी मुलीवर अत्याचार

म्हापसा : बार्देश तालुक्यात एका 4 वर्षीय विदेशी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली आरोपाखाली हणजूण पोलिसांनी संशयित आरोपी मो. फैयाज आलम (२९, रा. मूळ बिहार) यास अटक केली.

ही घटना सोमवार दि. ९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास घडली. पीडित मुलगी संशयिताच्या घरासमोरील शेडमध्ये संशयिताच्या मुलीसोबत खेळत होती. संशयित आरोपीने पीडित मुलीला पकडले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

ही गोष्ट नंतर रात्री पीडित मुलीने आपल्या आईला सांगितल्यावर आईने हणजूण पोलिसांत धाव घेतली व रितसर तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी १० रोजी दुपारी संशयिताला पकडून अटक केली.

संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम ६५(२), बाल कायदा कलम ८(२) व पोक्सो कायदा कलम ४, ८, १२ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.