खोर्ली-म्हापसा : मृत कुत्र्याला दुचाकीला बांधून ओढत नेणार्‍याला अटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
06th September, 01:38 pm
खोर्ली-म्हापसा : मृत कुत्र्याला  दुचाकीला बांधून ओढत नेणार्‍याला अटक

म्हापसा : घाटेश्वरनगर, खोर्ली म्हापसा येथे मृत कुत्र्याची विल्हेवाट लावण्यासाठी दुचाकीला बांधून नेणार्‍या अशोक निंगाप्पा पन्हाळकर (रा. घाटेश्वरनगर व मूळ बेळगाव) यास पोलिसांनी अटक केली.

ही घटना बुधवारी रात्री ८.४० च्या सुमारास घडली होती. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. घाटेश्वरनगर येथे एका कुत्र्याचा मृत्यू झाला होता व तो कुजल्याने घटनास्थळी दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे विल्हेवाट लावण्यासाठी संशयित आरोपी आपल्या दुचाकीला बांधून या मृत कुत्र्याला ओढत नेत होता.

याबाबतचा व्हिडिओ काहींनी काढला व सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यानुसार म्हापसा पोलिसांनी संशयिताला पकडून ताब्यात घेतले व त्याच्याविरूध्द भारतीय न्याय संहितेच्या ३२५ व प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा कलम ११ (१ )(अ)(ड) अन्वये गुन्हा नोंद केला व संशयिताला अटक केली.


हेही वाचा