बांदोडा येथे चालत्या स्कुटरला आग

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th September, 12:29 am
बांदोडा येथे चालत्या स्कुटरला आग

फोंडा : बांदोडा येथील महालक्ष्मी मंदिरजवळ चालत्या स्कुटरला आग लागण्याची घटना गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. रस्त्यावर बंद पडलेल्या दुचाकीची दुरुस्ती करण्यासाठी स्कुटर घेऊन जाणारा मेकॅनिक सुखरूप बचावला. फोंडा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन आग विझविली.

कुर्टी येथील एका गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवलेली स्कुटर घेऊन मेकॅनिक अन्य एक दुचाकी दुरुस्ती करण्यासाठी गावणे - बांदोडा भागात जात होता. पण महालक्ष्मी मंदिर जवळ पोहचताच स्कुटरला आग लागली. स्कुटर चालकाने आणि स्थानिक लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण, आगीने उग्र रूप धारण केल्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. मात्र, अग्निशमन दलाचे कर्मचारी पोहचेपर्यंत स्कुटर पूर्णपणे जळून खाक झाली. 

हेही वाचा