पुढील सुनावणी २३ सप्टेंबर रोजी होणार
पणजी : पाटो - पणजी येथील सोहो क्लबच्या आवारात क्षुल्लक कारणावरून फोंडा येथील युवकाला धक्काबुक्की करून त्याचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणातील चार संशयितांना पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ सप्टेंबर रोजी होणार आहे.
या प्रकरणी फोंडा येथील शार्दुल शेणवी खांडेपारकर यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार तक्रारदार आणि त्याचे इतर मित्र शनिवारी पाटो - पणजी येथील एका क्लबमध्ये गेले होते. शनिवारी पहाटे ५.३० ला क्लबमधून बाहेर पडताना क्षुल्लक कारणावरून दोन्ही गटात वाद झाला.
त्यात तक्रारदार खांडेपारकर आणि त्याच्या मित्रांना विराज गडकरी, झियाउद्दीन मन्सूर, अादित्य नाईक आणि त्याच्या मित्रांनी धक्काबुक्की केली. याशिवाय तक्रारदाराला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याचा गळा आवळला असे तक्रारीत नमूद केले.
याची दखल घेऊन पणजी पोलिसांनी विराज गडकरी, झियाउद्दीन मन्सूर, अादित्य नाईक आणि त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. दरम्यान या प्रकरणातील फ्रान्सिस फर्नांडिस, प्रिन्स फर्नांडिस, सॅमी उर्फ सैमुल्ला बायडगी आणि प्रबीन फर्नांडिस या पाच जणांनी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला.
या प्रकरणी संशयितांतर्फे अॅड. साहीश म्हाबरे यांनी युक्तिवाद केला. त्यात त्यांनी तक्रारदारांनी वाट अडवून शिव्या दिला. एका मंत्र्याच्या मुलगा तक्रारदाराचा मित्र असून त्यानेच प्रथम वाद घातला. तसेच शिव्या दिला. तसेच संशयितांना मारहाण केली. असे असताना संशयितांनी शुल्लक वाद असल्यामुळे सोडून देत घरी आले.
त्यानंतर पोलीस घरी आल्यामुळे गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली. याप्रकरणात एका मंत्र्याच्या मुलाचा सहभाग असल्यामुळे उलट गुन्हा दाखल केल्याचा दावा न्यायालयात केला. याची दखल घेत न्यायालयाने संशयित चार युवकांना अंतरिम दिलासा दिला आहे.
याशिवाय पोलिसांना पुढील सुनावणीवेळी बाजू मांडण्यास सांगून सोहो बार अॅन्ड रेस्ट्रोरेन्ट व क्लॅबच्या संदर्भात परवान्याचे दस्तावेज सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ सप्टेंबर रोजी होणार आहे.