पुणे : पुणे पोलिसांनी नुकतेच पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दिलीप खेडकर यांनी त्यांच्या मुलीसाठी (पूजा खेडकर) स्वतंत्र केबिनची मागणी करत पुण्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप आहे.
यासंदर्भात माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, पूजा खेडकर यांची सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करतांना दिलीप खेडकर यांनी तहसीलदार दीपक आकडे यांच्याविरोधात धमकीची भाषा वापरल्याचा तक्रारीत उल्लेख आहे. दिलीप यांनी तहसीलदारांकडे आपल्या मुलीसाठी केबिन खाली करण्याची मागणी केली होती.
पुणे पोलिसांच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट रोजी रात्री बुंडेगार्डन पोलीस स्थानकांत भादंवि कलम १८६, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'पुजा खेडकर सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर असताना, दिलीप खेडकर यांनी तहसीलदार दीपक आकडे यांच्या विरोधात धमकीची भाषा वापरली आणि पूजासाठी केबिनची तत्काळ तरतूद करण्यास सांगितले.'. एकूणच खेडकर कुटुंबियांच्या अडचणी काही कमी होतांना दिसत नाहीत.