गोवा वैद्यकीय महाविद्यालय बुद्धिबळ चॅम्पियन

गोवा विद्यापीठाची आंतरमहाविद्यालयीन मिश्र बुद्धिबळ स्पर्धा

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th July, 10:35 pm
गोवा वैद्यकीय महाविद्यालय बुद्धिबळ चॅम्पियन

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी), बांबोळीने आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ (मिश्र) स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेचे आयोजन गोवा विद्यापीठातर्फे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम, ताळगाव येथे करण्यात आले होते.

पीईएस रवी एस. नाईक महाविद्यालय आर्ट्स आणि सायन्स फर्मागुढीला तृतीय उपविजेतेपद तर डॉन बॉस्को महाविद्यालय अभियांत्रिक विद्यालय, फातोर्डाला तिसरे स्थान प्राप्त झाले. श्री दामोदर महाविद्यालय वाणिज्य आणि इकोनॉमिक्स मडगावच्या आयुष शिरोडकर याला उत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार देण्यात आला.

बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे अश्विन लवंदे (उप रजिस्ट्रार शैक्षणिक, गोवा विद्यापीठ) आणि सन्माननीय अतिथी म्हणून संकेत गावडे (सहाय्यक रजिस्ट्रार, अॅडमिशन, गोवा विद्यापीठ), अरविंद म्हामल (आंतरराष्ट्रीय आर्बिटर), दत्ताराम पिंगे (फिडे आर्बिटर), बालचंद्र जडार (गोवा विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागाचे सहाय्यक संचालक) यांची उपस्थिती होती.

जीएमसी बांबोळीच्या संघात अन्वेश बांदेकर, ख्रिस्टली परेरा, सोहम नाईक, वर्धान शेटकर आणि स्टीव्हन फाशो यांचा समावेश होता. पीईएस रवी नाईक महाविद्यालयाच्या संघात सात्विक केरकर, तनय मडकईकर, तेजस गावडे, कार्तिक कावडे व वर्धमान केरकर यांचा समावेश होता. तृतीय स्थानावरील डॉन बॉस्को संघात व्रज परोब, इशान पागी, आयुश नगर्सेकर, अर्थ वजनदार आणि संजीव परब यांचा समावेश होता.