प्राथमिक विद्यालायातील शिक्षिकेची बदली त्वरित रद्द करा: पालक आक्रमक

पालकांची भाग शिक्षण अधिकारी कार्यालयात धाव

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th July, 04:53 pm
प्राथमिक विद्यालायातील शिक्षिकेची बदली त्वरित रद्द करा: पालक आक्रमक

फोंडा : जुना बाजार फोंडा येथील सरकारी प्राथमिक विद्यालायाच्या शिक्षिकेची बदली त्वरित रद्द न केल्यास मुलांना विद्यालयात न पाठविण्याचा इशारा शुक्रवारी पालकांनी दिला आहे. विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १४० विध्यार्थ्यांच्या पालकांनी शुक्रवारी सकाळी भाग शिक्षण अधिकारी कार्यालयात या विषयासंबंधीचे निवेदन दिले आहे. 

सरकारी विद्यालयाची शिक्षिका नीता पेडणेकर यांची इतर विद्यालयात काही दिवसापूर्वी बदली करण्यात आली. त्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त करत शुक्रवारी अंदाजे ६०-७० पालकांनी भाग शिक्षण अधिकारी कार्यालयात धडक दिली. त्यावेळी भाग शिक्षण अधिकारी हजर नसल्याने पालकांनी निवेदन इतर कर्मचाऱ्याकडे सुपूर्द केले. 

विद्यालयात एकूण १४० विध्यार्थी शिक्षण घेत असून गेल्या काही वर्षापासून शिक्षिका नीता पेडणेकर उत्कृष्टपणे अध्यापनाचे काम करीत आहे. परंतु शिक्षण खात्याने शिक्षिकेची बदली इतर विद्यालयात केल्याने पालक नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षिकेची बदली रद्द न केल्यास विद्यार्थ्यांना घरी ठेवण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. .