ओटीटी प्लॅटफॉर्मवर या वीकेंडला मनोरंजनाची चांगली मेजवानी प्रेक्षकांसाठी असणार आहे. ओटीटीवर आठवड्यातील कोणत्याही दिवसात नवीन चित्रपट, वेब सीरिज रिलीज करण्यात येते. मात्र, शुक्रवारी अनेक चित्रपट, वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येतात. आज, 26 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपट, वेब सीरिज येणार आहेत.
या वीकेंडला कोणते चित्रपट होणार रिलीज?
ब्लडी इश्क
अभिनेत्री अविका गौरची हा हॉरर चित्रपट आहे. ब्लडी इश्क हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात अविकाच्या भूमिकेचे कौतुक करण्यात आले होते.
भैय्याजी
मनोज वाजपेयीची मुख्य भूमिका असलेला भैय्याजी हा चित्रपट 26 जुलैपासून 'झी 5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला सरासरी प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता भैय्याजी प्रेक्षकांच्या भेटीला ओटीटीवर येणार आहे.
मिस्टर अॅण्ड मिसेस माही
राजकुमार राव आणि जान्हवी कपूरची भूमिका असलेला हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आता ओटीटीवर पाहता येणार आहे. थिएटरमध्ये बऱ्यापैकी कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.
चटनी सांबर
कॉमेडी ड्रामा धाटणीची ही तमिळ वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिस्नी प्लस हॉटस्टार ही वेब सीरिज 26 जुलैपासून स्ट्रीम करणार आहे. या वेब सीरिजमध्ये योगी बाबू मु्ख्य भूमिकेत दिसणार आहे.
द ड्रॅगन प्रिन्स
अॅनिमेटेड फिल्म ड्रॅगन प्रिन्स ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 26 जुलै रोजी रिलीज होणार आहे. फक्त लहान मुलांसाठीच नव्हे तर सर्वच वयोगटातील प्रेक्षकांसाठी हा चित्रपट आहे.