पूर्व लडाख : ITBPची धडक कारवाई; चीनच्या सीमेवर १०८ किलो सोन्यासह दोन तस्करांना अटक

आयटीबीपीच्या नॉर्थ वेस्ट फ्रंटियर बटालियनच्या गस्ती पथकाने चीनच्या सीमेवर १०८ किलो सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन भारतीय नागरिकांना अटक केली आहे. दरम्यान त्यांच्याकडून चीनी बनावटीच्या अनेक वस्तु देखील जप्त करण्यात आल्या आहेत.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11th July, 09:51 am
पूर्व लडाख : ITBPची धडक कारवाई; चीनच्या सीमेवर १०८ किलो सोन्यासह दोन तस्करांना अटक

लडाख : लडाखमध्ये आयटीबीपीच्या जवानांना मोठे यश मिळाले आहे. काल १० जुलै रोजी आयटीबीपीच्या नॉर्थ वेस्ट फ्रंटियर बटालियनच्या गस्ती पथकाने सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन भारतीय नागरिकांना अटक केली आहे.आयटीबीपीच्या पथकाने धडक कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल १०८.०६०  किलो सोने,चायनीज खाद्यपदार्थ व चलन जप्त केले आहे.Two smugglers held with 108 kg gold in Ladakh: ITBP - greaterkashmir

या प्रकरणाची माहिती देताना, उत्तर पश्चिम सीमावर्ती बटालियनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आयटीबीपीची २१ वी बटालियन पूर्व लडाखमधील दक्षिणी उपक्षेत्रातील (चिसामुले, नरबुला टॉप, झाकले आणि जकला) सीमा भागात घुसखोरी आणि तस्करी रोखण्यासाठी गस्त घालत होती. या तुकडीचे नेतृत्व डीसी दीपक भट्ट करत होते.ITBP Seizes 108 Gold Bars in Major Smuggling Crackdown at India-China  Border | Law-Order

दरम्यान, बुधवारी गस्ती पथकाने आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सिरिगापाल भागात दोन लोकांना खेचरांसह पाहिले. चौकशी केली असता त्यांनी औषधी वनस्पती गोळा करत असल्याचे सांगितले, मात्र त्यांच्या सामानाची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात सोन्याची बिस्किटं सापडली. गस्ती पथकाने दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर या प्रकरणाची माहिती आयटीबीपीच्या २१  व्या बटालियनचे कमांडंट अजय निर्मळकर यांना देण्यात आली.108 Kg Gold Smuggled from China Seized in Ladakh

४० वर्षीय तेनझिन टार्गी आणि ६९ वर्षीय त्सेरिंग चंबा अशी संशयितांची नावे आहेत. जप्त केलेल्या सोन्याचे वजन १०८.०६० किलो आहे. याशिवाय दोन खेचर, दोन मोबाईल फोन, एक दुर्बीण व चायनीज खाद्यपदार्थ यासह एक पॅकेट केक, एक पॅकेट लाओ बीजिंग, दोन दुधाचे डबे, दोन पॅकेट लस्सी, दोन चाकू, एक वंडर टॉर्च, एक हातोडा आणि एक पक्कड जप्त करण्यात आले.108 Kg Of Smuggled Gold Seized Near India-China Border In Ladakh; 3 Arrested  - News18


हेही वाचा