माणूस की सैतान ? बापानेच केला मुलीवर बलात्कार; न्यायालयाने ठोठावली आजन्म कारावासाची शिक्षा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
07th July, 10:26 am
माणूस की सैतान ? बापानेच केला मुलीवर बलात्कार; न्यायालयाने ठोठावली आजन्म कारावासाची शिक्षा

बुलढाणा : देशभरात आजकाल गुन्हेगारीची इतकी प्रकरणे वाढली आहेत की आपण मानव आहोत की दानव हेच कळायला मार्ग नाही. त्यात खून आणि बलात्कार सारख्या घटना इतक्या सर्रासपणे घडतात की माणसाची संवेदना देखील मृत पावली आहे.  महाराष्ट्राच्या बुलढाणा येथून अशीच एक किळसवाणी घटना समोर आली आहे. मुलीची तब्येत पोटदुखीमुळे बिघडल्याने उपचारासाठी आईने तिला रुग्णालयात नेले आणि आईच्या पायाखालची जमिनच सरकली.तपासणी दरम्यान संबंधित बालिका चार महिन्यांची गर्भवती असल्याचे आढळून आले.

 डॉक्टरांनी मुलीला विश्वासात घेऊन  चौकशी केली असता बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे उघडकीस आले . यामुळे आईसह, डॉक्टर, पोलिसही चक्रावले. दरम्यान, बापलेकीच्या पवित्र नात्याला कलंक लावणाऱ्या या नराधम पित्याला बुलडाणा येथील प्रमुख जिल्हा न्यायालयाने आजन्म (मरेपर्यंत) कारावासाची कठोर शिक्षा ठोठावली आहे. स्थानिय प्रमुख जिल्हा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी हा निकाल दिला आहे.Cry For Justice: Mumbai Woman Says She Woke Up To Instagram Friend Raping  Her - odishabytes

वासनांध विकृतांना जरब बसविणारा हा निकाल आहे. शेख शकील असे नराधम आरोपी पित्याचे नाव आहे. ही संतापजनक घटना २०२३ मध्ये घडली होती. मार्च २०२३ मध्ये चिखली तालुक्यातील पीडित १६  वर्षीय मुलगी पोट दुखत असल्याने आपल्या आईसह चिखली येथील दवाखान्यात गेली होती. दरम्यान, डॉक्टरांनी मुलीला तपासले असता ती चार महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली. याप्रकरणी अटक झाल्यानंतर बुधवारी नराधम बापाला शिक्षा सुनावण्यात आली.Child Sexual Abuse in India: Alarming statistics, lifelong impact, how to  heal - India Today

हेही वाचा