पुणे : बोपदेव घाटात २१ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार; पोलिसांनी घेतले तिघांना ताब्यात

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th October, 02:40 pm
पुणे : बोपदेव घाटात २१ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार; पोलिसांनी घेतले तिघांना ताब्यात

कोंढवा : देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराने परिसीमा गाठली आहे. महाराष्ट्रातील पुण्यातून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरत असलेल्या युवतीवर तिघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. गुरुवारी रात्री ११च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कोंढवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आहे.  

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती मूळची सुरतची असून ती आणि तिचा जळगाव येथील रहिवासी असलेला मित्र दोघेही पुण्यातील एका महाविद्यालयात शिकत आहेत . काल रात्री ते दोघे दुचाकीवरून बोपदेव घाटाच्या निर्जन भागात फिरायला गेले होते. रात्री अकराच्या सुमारास तेथेच असलेल्या तिघांनी युवतीवर सामूहिक बलात्कार केला. दरम्यान तिच्या मित्राने तिला एका खाजगी रुग्णालयात नेले. तिची तपासणी केल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याची पुष्टी झाली.

या प्रकरणावर पोलिस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या भागात हा गुन्हा घडला तो भाग निर्जन असून येथे अगदीच कमी उजेड आहे. ररुग्णालयातून याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हे शाखेच्या १० पोलिसांची तुकडी स्थापन केली, व घतातच असलेल्या तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाई सुरू आहे. 


हेही वाचा