पोरस्कडे - न्हयबाग जंक्शनवर कंटेनरला कारची धडक

कंटेनर दुभाजकावर चढला; बलेनो कारचे नुकसान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th July, 12:16 am
पोरस्कडे - न्हयबाग जंक्शनवर कंटेनरला कारची धडक

पेडणे : पोरस्कडे न्हयबाग जंक्शनवर शनिवारी दुपारी मालवाहू कंटेनर मालपेहून महाराष्ट्राच्या दिशेने जात होता. कंटेनर जंक्शनवर असलेल्या दुभाजकावर चढला. याचवेळी समोरुन येत असलेली बलेनो कार (जी.ए. ११ ए -७३३३) त्याला धडकली. अपघातात कारचालक बचावला. मात्र, कारचे नुकसान झाले.

अपघाताची माहिती मिळताच पेडणे पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी पंचनामा केला. हा मालवाहू ट्रक मालपेहून पत्रादेवीच्या दिशेने जात होता. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर दुभाजकावर चढून अपघात घडला.

यापूर्वी या ठिकाणी अपघात होऊन अनेक जण जखमी झाले आहेत. तर, काही दिवसांपूर्वी एका महिलेचा या जंक्शनवर अपघातात बळी गेला होता. वारंवार नागरिक आणि स्थानिक आमदारांनी मागणी करुनही याठिकाणी उपाययोजना करण्यात आली नाही. स्थानिक नागरिक तसेच लोकप्रतिनिधी अपघात क्षेत्राबाबत प्रस्ताव संबंधित खात्याकडे पाठवून उपाययोजना करण्याची मागणी करतात. मात्र, त्याकडे सरकार आणि संबंधित खाते दुर्लक्ष करत आहे. या ठिकाणीअपघाताची मालिकाच सुरू झाली आहे. मालपेहून येताना उतरणीवर मोठी अवजड वाहने भरधाव वेगाने येतात आणि या जंक्शनवर आल्यानंतर याठिकाणी अपघात होतात. यावर सरकारने तोडगा काढावा, अशी मागणी पंच सदस्य एकनाथ तेली यांनी केली आहे. 

हेही वाचा