शांत गोव्यात अशांतता पसरविण्याची चाल सुरू
काणकोण : सेंट फ्रान्सिस झेवियरसंबधी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी प्रा. सुभाष वेलिंगकर यांना अटक करावी अशी मागणी करत शेकडो ख्रिस्ती धर्मियांनी व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शनिवारी ५ ऑक्टोबरला सकाळी काणकोण पोलीस स्थानकावर मोर्चा नेला.
या मोर्चावेळी काणकोणचे माजी आमदार इजिदोर फर्नांडिस, कॉग्रेस पक्षाचे नेते जनार्दन भंडारी, प्रवीर भंडारी, नगरसेवक शुभम कोमरपंत, सायमन रेबेलो, गास्पार कुतिन्हो, लेव्हीन ग्रासियस व इतर उपस्थित होते.
यावेळी पत्रकाराशी बोलताना इजिदोर फर्नांडिस यांनी सांगितले की शांत गोव्यात हिंदू,मुस्लिम, ख्रिस्ती एकोप्याने राहत असून शांत गोव्यात अशांतता पसरविण्याची ही चाल सुरू झाली आहे, ती आम्ही खपवून घेणार नाहीत. प्रा. वेलिंगकर यांना अटक न केल्यास पुढील कृती करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.