कळंगुट व म्हापशात तीन मोबाईल चोरट्यांना अटक; नव्या कायद्यांखाली गून्हे नोंद

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
06th July, 03:52 pm
कळंगुट व म्हापशात तीन मोबाईल चोरट्यांना अटक; नव्या कायद्यांखाली गून्हे नोंद

म्हापसा :  कळंगुट व म्हापसा येथे मोबाईल फोन चोरी प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांच्याकडून चोरीचे दोन मोबाईल फोन हस्तगत केलेत.अटक केलेल्या संशयितांमध्ये मोहम्मद इस्माईल शेख (बिहार), सावन बाळू राठोड (कर्नाटक) व मोमिनुल मुल्ला (पर्रा व मूळ पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे. 

समोर आलेल्या कळंगुटमध्ये मोबाईल हिसकावण्याची घटना शुक्रवारी 5 रोजी संध्याकाळी घडली. फिर्यादी मुझावर उल्ला (दावणगिरी कर्नाटक)आपल्या मित्रांसोबत रस्त्याने चालत जात असतांना दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांच्या हातातील मोबाईल फोन हिसकावत पळ काढला

फिर्यादींनी कळंगुट पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी लगेच कारवाई करीत संशयित आरोपी मोहम्मद शेख व सावन राठोड या दोघांना पकडून अटक केली व मोबाईल फोन हस्तगत केला. संशयितांविरूध्द भारतीय न्याय संहितेच्या १३४, ३०३  व ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस, निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विशाल गावस करीत आहेत. 

दुसरी चोरीची घटना म्हापसा येथील मार्केट सब यार्डमध्ये गुरूवारी संद्याकाळी ४च्या सुमारास घडली. फिर्यादी सचिन राठोड यांच्या मार्केट सबयार्ड मधील फळांच्या दुकानात त्यांचा नातेवाईक अम्रेश चव्हाण हा झोपला होता. हीच संधी साधून संशयित आरोपीने दुकानातील मोबाईल फोन चोरून पळ काढला. 

हा चोरीचा प्रकार दुकानातील सीसीटिव्ही फुटेजमध्ये बंदिस्त झाला होता. म्हापसा पोलिसांनी पर्रातील काही ग्रामस्थांच्या मदतीने संशयित आरोपी मोमिनुल मुल्ला यास पकडले व चोरीचा मोबाईल हस्तगत केला. संशयिताविरूध्द भारतीय न्याय संहिंतेच्या ३०५ कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

हेही वाचा