पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय महिला पराभूत; दक्षिण आफ्रिकेचा १२ धावांनी विजय

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
05th July, 10:40 pm
पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय महिला पराभूत; दक्षिण आफ्रिकेचा १२ धावांनी विजय

चेन्नई : भारतीय महिला क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात १२ धावांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. विजयासाठी १९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला २० षटकांत ४ गडी गमावून १७७ धावा करता आल्या.

सध्याच्या भारत दौऱ्यावरील दक्षिण आफ्रिका संघाचा हा पहिला विजय आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र खराब क्षेत्ररक्षणामुळे फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २० षटकांत ४ गडी गमावून १८९ धावा करता आल्या. तझमिन बाईट्सने ५६ चेंडूत ८१ धावांची खेळी करत संघाला १८९ धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि मारिजन कॅपने ३३ चेंडूंत ५७ धावांची खेळी केली.


तत्पूर्वी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २० षटकांत ४ गडी गमावून १८९ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी सलामीवीर तझमिन ब्रिट्सने सर्वाधिक धावा करत धमाकेदार खेळी खेळली.       

ब्रिट्सने ५६ चेंडूंचा सामना करत ८१ धावा केल्या. ती सलामीवीर म्हणून मैदानात उतरली. तिच्या बॅटमधून १० चौकार आणि ३ षटकार आले. तिचा स्ट्राईक रेट १४४.६४ होता. या खेळाडूने प्रथम कर्णधार लॉरा वोल्वार्डसह ४३ चेंडूंत ५० धावा जोडल्या. यानंतर तिने कॅपसोबत ५६ चेंडूंत ९६ धावांची भागीदारी केली. क्लो ट्रायॉनसोबत तिने १८ चेंडूंत ३८ धावाही जोडल्या. टीम इंडियासाठी राधा यादव आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले.      

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ यांच्यात शुक्रवारी तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळवला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एम. चिदंबरम स्टेडियमवर खेळवला गेला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. याआधी टीम इंडियाने ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका ३-० ने क्लीन स्वीप केली आहे, तर एकमेव कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा १० गडी राखून पराभव केला आहे.