चायना ओपनमध्ये कोको गॉफ उपांत्य फेरीत

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
04th October, 11:53 pm
चायना ओपनमध्ये कोको गॉफ उपांत्य फेरीत

बीजिंग : चायना ओपनमध्ये अमेरिकेची सहावी मानांकित खेळाडू कोको गॉफने युक्रेनच्या युलिया स्टारोडबत्सेवाविरुद्ध पहिल्या सेटमधील पिछाडीनंतर जोरदार पुनरागमन करत गुरुवारी बीजिंग येथे विजयासह स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले.
गॉफने जागतिक क्रमवारीत ११५व्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूचा २-६, ६-२, ६-२ असा पराभव करून आगेकूच केली.
अन्य एका उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या १९ व्या मानांकित पॉला बडोसाने स्थानिक खेळाडू झांग शुईचा ६-१ ७-६(४) असा पराभव करून उपांत्यफेरीत धडक दिली आहे. त्यामुळे उपांत्य फेरीमध्ये गॉफचा सामना स्पेनच्या पॉला बडोसाशी होणार आहे. उपांत्य फेरीचा हा रोमाचंक सामना शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी भारतीय प्रमाणवेळनुसार सकाळी ११.४५ वाजता सुरू होईल.
दरम्यान, बडोसाने मे पासून ३५ पैकी २८ सामने जिंकले आहेत आणि गेल्या पाच पैकी तीन स्पर्धांमध्ये उपांत्य फेरी गाठली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीतही तिने मजल मारली होती.

हेही वाचा