नॉर्थईस्टविरुद्ध एफसी गोवाची बरोबरी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
04th October, 11:50 pm
नॉर्थईस्टविरुद्ध एफसी गोवाची बरोबरी

मडगाव : नाट्यमयरीत्या रंगलेल्या आणि गोलांनी भरलेल्या सामन्यात, एफसी गोवाने शुक्रवारी फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर त्यांच्या इंडियन सुपर लीग २०२४- २५ च्या लढतीत नॉर्थईस्ट युनायटेड एफसी विरुद्ध ३-३ अशी बरोबरी साधली.
पाहुण्या नॉर्थईस्ट युनायटेडने खेळाची धडाकेबाज सुरुवात केली. त्यांच्या नेस्टर अल्बियाने सुरुवातीलाच सहाव्या मिनिटाला नेटचा वेध घेत पहिला गोल नोंदवला. तथापि, यजमान एफसी गोवाच्या आर्मांडो सादिकूने पहिल्या हाफमध्ये पेनल्टीसह ४५ व्या व ४७ व्या मिनिटाला असे दोन गोल करून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या हाफमध्ये आणखी गोल झालेले पाहायला मिळाले. नॉर्थईस्ट युनायटेडच्या नेस्टर अल्बियाचने ५१व्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधली. अलादीन अजराईने ५६ व्या मिनिटाला केलेल्या गोलद्वारे पाहुण्यांनी पुन्हा आघाडी मिळवली.
नॉर्थईस्ट युनायटेड विजयाकडे वाटचाल करत आहेत असे वाटत असतानाच, एफसी गोवाच्या बोर्जा हेर्रेराने अतिरिक्त वेळेत गोल करून बरोबरी साधली. त्यानंतर काही मिनिटांत नॉर्थईस्टचा बचावपटू रॉबिन यादवला सामन्यातील दुसरे यलो कार्ड मिळाल्यानंतर त्याला बाहेर पाठवण्यात आले.