भारताच्या विश्वचषक विजयात कारवारच्या 'रघू' राघवेंद्रचे महत्वपूर्ण योगदान..

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th July, 06:45 pm
भारताच्या विश्वचषक विजयात कारवारच्या 'रघू' राघवेंद्रचे महत्वपूर्ण योगदान..

कारवार : भारताने तब्बल १७ वर्षांच्या कालावधी नंतर अभूतपूर्व सांघिक कामगिरीच्या जोरावर टी२० विश्वचषकास गवसणी घातली. भारतीय संघातील खेळाडूंनी मिळवलेल्या निर्भेळ यशात संघाच्या सपोर्ट स्टाफचे देखील महत्त्वाचे योगदान आहे. आता सोशल मिडियावर विराट, रोहीत, हार्दिक यांच्यासह अन्य खेळाडूंसोबत चषक घेऊन पोज करणारी एक व्यक्ती चर्चेत आली आहे. ही व्यक्ती आहे कारवारच्या कुमठा तालुक्यातील रहिवासी रघू उर्फ राघवेंद्र दिवगी 

कारवार जिल्ह्यातील कुमठा तालुक्यातील दिवगी येथील राघवेंद्र दिवगी....१९९० च्या दशकात क्रिकेट मध्ये करिअर घडवण्यासाठी गाव सोडुन मुंबईत आला होता. मात्र क्रिकेटमधील कारकीर्द काही यशस्वी झाली नाही. त्यांनी हार न मानता बेंगळुर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी गाठली. तेथील रिहॅबसाठी येणाऱ्या खेळाडूंना तो मदत करू लागला. बीसीसीआयने त्याच्या मेहनतीची नोंद घेत भारतीय क्रिकेट संघात थॉट डाउन स्पेशालिस्ट म्हणून नियुक्त केले. We have improved against fast bowling due to Raghu, says Virat Kohli on  throwdown specialist | Cricket News - The Indian Express

रघू हे भारतीय संघासोबत गेल्या १३ वर्षांपासून आहेत. २०११-१२ साली इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या फलंदाजीवर बरेच प्रश्न निर्माण झाले होते. या मालिकेत अँडरसन-ब्रॉडच्या जोडगोळीने भारतीय फलंदाजीच्या सातत्याने  खिंडार पाडले. भारताने ही मालिका ०-४ ने गमावली.Throwdown specialist Raghu prefers India over England

भारताने यातून धडा घेत संघात अनेक बदल केले. वेगवान गोलंदाजी चा सराव व्हावा यासाठी रघूला नियुक्त करण्यात आले. रघू हा सातत्याने १४० + च्या गतीने अविरत थ्रोडाउन करू शकतो. याचाच फायदा रोहित शर्मा, विराट कोहली,चेतेश्वर पुजारा, अजिंक्य राणे, शिखर धवन सारख्या दिग्गज फलंदाजांना झाला.How an unglamorous cricket craft evolved into an attractive career option

भारतीय संघाने गेल्या दीड दशकात क्रिकेटविश्वावर राज्य केले आहे. २०११ चा वनडे विश्वचषक जिंकल्यानंतर भारताने २०१३ साली चॅम्पियनशिप चषक जिंकला, २०१४ साली पार पडलेल्या टी२० चषकाची अंतिम फेरी गाठली, २०१५ सालच्या वनडे विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. २०१६ साली पार पडलेल्या टी२० चषकाची उपांत्य फेरी गाठली. २०१९ सालच्या वनडे विश्वचषकात पुन्हा उपांत्य फेरी गाठली.World Cup 2019: The story so far - India's smooth journey to the semi-finals  | Crickit

पुन्हा २०२२च्या  टी२० चषकाची उपांत्य फेरी गाठली. २०२३ साली मायदेशात झालेल्या वनडे विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. ऑस्ट्रेलियात २ वेळा बॉर्डर गावस्कर चषक देखील दोन वेळा जिंकला. दोन वेळा टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत देखील दाखल झाले. गेल्या १५ वर्षांत आशिया खंडाबाहेर भारतीय संघास मोठ्या प्रमाणात यश मिळाले. याचे श्रेय जाते ते भारताचे थ्रोडाउन स्पेशलिस्ट रघू उर्फ राघवेंद्र देवागी यांना.  Helping Arms: Men who prepare Virat Kohli, Rohit Sharma with 150-plus  throwdowns | Cricket News - Times of India

बार्बडोसमध्ये टी-२० विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाच्या मेहनतीत राघवेंद्र यांचाही मोलाचा वाटा आहे. एका मुलाखती दरम्यान विराट कोहलीला त्याच्या २०२२ पासून बहरलेल्या कामगिरी बाबत विचारण्यात आले होते. तेव्हा विराटने एक मजेशीर किस्सा सांगितला. विराट इंग्लंड, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडविरुद्ध खेळतांना अनेकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर आऊट व्हायचा. २०२२ नंतर यावर विराटने यावर खूप मेहनत घेतली. रघू सातत्याने १५०-१५५ किमीच्या गतीने थ्रोडाउन करतो त्यामुळे फलंदाजाला वेगवान चेंडू खेळण्याची सवयच होऊन जाते. गेल्या वनडे विश्वचषकात याचीच प्रचिती आली. विराट कोहलीने या स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकवण्याचा मान पटकावला. 

हेही वाचा