जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, चार दहशतवादी ठार तर एक जवान हुतात्मा

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममधील मोदरगाम आणि फ्रिसल चिन्निगाम भागात दहशतवाद्यांविरोधात लष्कराचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
07th July, 12:29 pm
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, चार दहशतवादी ठार तर एक जवान हुतात्मा

कुलगाम : शनिवारी, ६  जुलै रोजी जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सैन्य दलाच्या जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. जिल्ह्यात दोन ठिकाणी सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. कुलगाममधील मोदरगाम आणि फ्रिसाल चिन्निगाम भागात दहशतवाद्यांविरोधात लष्कराचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. मोदरगाममध्ये सुरू असलेल्या चकमकीत एक जवान हुतात्मा झाल्याचे वृत्त आहे. तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे. जखमी जवानाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.Jammu & Kashmir: Second Encounter Underway In Kulgam As Security Forces  Engage Terrorists In Chanigam Village

समोर आलेल्या माहितीनुसार; गुप्तचरांकडून सुरक्षा दलांना कुलगाम जिल्ह्यातील मोदरगाम भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी तत्काळ प्रभावाने संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू केली. 

इनपूटनुसार सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले. चहूबाजूंनी घेरले गेल्याची कुणकुण लागताच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात सैन्य दलानेही गोळीबार केला. या गोळीबारात लष्कराचे दोन जवान जखमी झाले. जखमी जवानांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान एक जवान हुतात्मा  झाला.



हेही वाचा