गोवा : गोव्याच्या हद्दीत बुल ट्रॉलिंग; कर्नाटकातील दोन बोटी जप्त

स्थानिकांच्या मदतीने मत्स्योद्योग खात्याची कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
गोवा : गोव्याच्या हद्दीत बुल ट्रॉलिंग; कर्नाटकातील दोन बोटी जप्त

मालपे-कर्नाटक येथील जप्त करण्यात आलेल्या बोटी. (नारायण पिसुुर्लेकर)

पणजी : मत्स्योद्योग खात्याने गोव्याच्या सागरी हद्दीत अवैधपणे घुसून बुल ट्रॉलिंग करणाऱ्या मालपे-कर्नाटक येथील दोन बोटी जप्त केल्या. अन्य दोन बोटी पळून जाण्यात यशस्वी ठरल्या. ही घटना शनिवारी पहाटे पाचच्या दरम्यान घडली. या कारवाईत किनारी पोलीस आणि स्थानिक मच्छीमारांनी देखील सहभाग घेतला होता. पकडलेल्या बोटींवरील माशांचा लिलाव करून बोट मालकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी स्पष्ट केले आहे.
गेले काही दिवस मालपे येथील बोटी गोव्याच्या सागरी हद्दीत घुसून बेकायदेशीरपणे मासेमारी करत असल्याची तक्रार स्थानिक मच्छीमारांनी केली होती. याबाबत काही दिवसांपूर्वी पोलिसांत तक्रारही नोंदवली होती. यानंतर मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी कर्नाटक मत्स्योद्योग खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.
मालपे येथील बोटी गोव्याच्या हद्दीत येण्याचे प्रकार सुरूच होते. मत्स्योद्योग खात्याने असे प्रकार रोखण्यासाठी विशेष कृती दलाची नियुक्ती केली. जप्त केलेल्या बोटी पणजी जेटीवर आणण्यात आल्या आहेत.

हेही वाचा